Ravindra Dhangekar : आमदार रवींद्र धंगेकर मुंबईत दाखवणार 'पुणेरी हिसका', वरळीमधील 'हिट अँड रन' प्रकरणी पोलिसांना...

Worli Hit And Run Case Ravindra Dhangekar Police : वरळीतील घटना गंभीर आहे. यात दोन आरोपींना अटक केले असले तरी मुख्य आरोपी अजून फरार आहे. तो कसा काय फरार झाला? त्यामागे कोण आहे? असा सवाल करत आमदार धंगेकर यांनी केला आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekarsarkarnama

Ravindra Dhangekar : मुंबईतील वरळी 'हिट अँड रन' केस प्रकरणात काँग्रेसचे पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर आक्रमक झाले आहेत. या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला नाही तर मी स्वतः वरळीत जाऊन आंदोलन करेल, असा इशारा आमदार धंगेकर यांनी दिला आहे. मुख्य आरोपीला पोलिसांनी अजून का अटक केले नाही, याचा जाब विचारण्यासाठी धंगेकर आज (सोमवारी) वरळी पोलिस ठाण्यात जाणार आहेत.

वरळीतील घटना गंभीर आहे. यात दोन आरोपींना अटक केले असले तरी मुख्य आरोपी अजून फरार आहे. तो कसा काय फरार झाला? त्यामागे कोण आहे? मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळणार आहे का? असा सवाल आमदार धंगेकर यांनी केला आहे. तसेच मी स्वतः जाऊन वरळीत आंदोलन करेल, असा इशारा देखील धंगेकरांनी दिला आहे.

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील पोर्शे अपघातात सतत पाठपुरावा केल्याने त्यामागे असलेली भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा उघडी पडली होती.

मुख्यमंत्र्यांनी एका पबवर बुलडोझर फिरून राज्यभर कारवाई सुरू असल्याचे चित्र उभे केले. बुलडोजर बाबा स्वतःला म्हणून घेतले. परंतु हे चित्र सगळं खोटं आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.मुख्य आरोपी हा वरळीतील एका पबमधून निघाला होता. याचा अर्थ त्याने व्यसन केलेले असावे. पोलिसांनी मुख्य आरोपीला आतापर्यंत का अटक केली नाही, याची विचारणा करण्यासाठी आज दुपारी मी वरळी पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

Ravindra Dhangekar
Worli Hit And Run Case : वरळी अपघातातील घटनाक्रम उलगडला; पोलिसांच्या हाती मोठी माहिती

आरोपी फरार यामागे राजकारण

शिवसेनेचे आमदार सचिन आहेर यांनी देखील वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी संताप व्यक्त केला. मुख्य आरोपी कसा सापडत नाही, राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असा सर्वसामान्य प्रश्न पडला आहे. पोलिस सीबीआय इंटेलिजन्स एवढी यंत्रणा असून देखील मुख्य आरोपी दोन दिवसापासून का सापडत नाही यामागे काही मोठे राजकारण आहे का? असा सवाल सचिन आहेर यांनी उपस्थितीत केला.

(Edited By Roshan More)

Ravindra Dhangekar
Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 'खेला होबे'? सर्वात सुरक्षित मानली जाणारी काँग्रेसच डेंजर झोनमध्ये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com