NCP Politics : सुरज चव्हाणांच्या नियुक्तीमुळे अजितदादांचं टेन्शन वाढणार, तटकरेंच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीतील एक गट नाराज
Mumbai News, 16 Aug : पावसाळी अधिवेशानाच्या काळात थेट विधिमंडळात रमी खेळण्यामुळे वादात सापडलेले तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या टेबलवर पत्ते फेकले म्हणून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगेंना सूरज चव्हाण यांनी गंभीर मारहाण केली होती.
या मारहाणीनंतर छावा संघटना प्रचंड आक्रमक झाली होती. तर राज्यभरातून टीका झाल्यानंतर सूरज चव्हाणांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून काढण्यात आलं. मात्र, आता या मारहाणीच्या प्रकरणाला एक महिणा पूर्ण व्हायच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरज चव्हाण यांना दिलं. यावेळी मंत्री छगन भुजबळ, आमदार आदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित होते. मात्र, या नियुक्तीनंतर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर विरोधकांनी सडकून टीका करायला सुरूवात केली आहे.
तर अजितदादांनी आपणाला या नियुक्तीबाबत माहिती नसल्याचं म्हटलं होतं. या सर्व प्रकारामुळे राष्ट्रवादीत सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. अशातच आता अजितदादांच्या तटकरेंच्या कार्यप्रणालीवर राष्ट्रवादीतील एक गट नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.
या सर्वांनी सूरज चव्हाण यांची पक्षाच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यावर नाराजी दर्शवली आहे. शिवाय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या मनमानी कार्यपद्धतीवर देखील हा गट नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवात दोन गट पडल्याचं बोललं जात आहे.
पक्षाच्या नाराज गटाने आपली नाराजी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्याकडेही व्यक्त केल्याची माहिती आहे. शिवाय सुनील तटकरे अनेक निर्णयांमध्ये सर्वांना विश्वासात घेत नसल्यामुळे अनेकजण नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रावादीत सध्या दोन गट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.