Yashomati Thakur : काँग्रेसचाही भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध, यशोमती ठाकूर म्हणाल्या, 'मोदीजी जय शहाला बोलायला घाबरतात...'

Yashomati Thakur India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केला आहे. आता यशोमती ठाकूर यांनी देखील या सामन्याला विरोध केला आहे.
Yashomati Thakur Narendra Modi
Yashomati Thakur Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Yashomati Thakur News : आशिया चषक क्रिकेट सामन्यामध्ये भारत पाकिस्तानचा सामना आज होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या सामन्याला विरोध केला आहे. पक्षाकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे. आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या सामन्याला विरोध केला आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, 'व्वा मोदीजी व्वा, काय देशभक्ती आहे तुमची? एकीकडे म्हणायचे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि दुसरीकडे भारताची भूमी सोडून दुबईमध्ये पाकिस्तानसोबत तुम्ही क्रिकेट खेळायला तयार झाला आहात. जय शहाच्या पुढे सगळे भाजपचे नेते गुडघे टेकता.'

'अनुराग ठाकूर, जय शहा ज्या प्रकारे पाकिस्तानी क्रिकेटसोबत बसतायेत, बोलतायेत ते पटण्यासारखे नाहीये. जे शहीद झाले, ज्यांचं बलिदान गेलं, ज्यांचे नवरे हिसाकावून नेले त्यांचा तरी विचार करा ना थोडा. दरवेळी व्यापाऱ्यांचा विचार कराल. मोदीजी हे जय शहाला बोलायला घाबरतात? बीसीसीआय कसा निर्णय घेऊ शकतं. काय सुरू आहे या देशामध्ये? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

'काहीतरी कणखर भूमिका घेतली पाहिजे. याच्यााआधी आपल्या देशाने पाकिस्तानसोबत खेळायला नकार दिला आहे. आणि आज तुम्ही तुमच्या पाठीचा कणा मोडल्यासारखे का वागताय? तुमच्यात देशप्रेम असेल, तुमच्यात डेअरींग असेल तर भारत पाकिस्तानसोबत खेळला नाही पाहिजे.

Yashomati Thakur Narendra Modi
Vijay Wadettiwar Politics : वडेट्टीवार म्हणतात, युवकांनी आपली शक्ती लढ्यासाठी वापरावे, आत्महत्या नकोच!

'एकीकडं युद्ध करायचं दुसरीकडे म्हणायचं सिंदूर सुरू आहे. आणि तिसरीकडे जाऊन नतमस्तक व्हायचं. व्यापाऱ्यांच्या हिशोबाने चालेल तर कसं होईल. या देशाच्या सैनिकाचा, येथील नागरिकाचा स्वाभिमान खेळापेक्षा मोठा नाही काय? त्यांचा स्वाभिमान बळकट राहिला पाहिजे, ही जबाबदारी या सरकारची आहे.', असे देखील ठाकूर म्हणाल्या.

Yashomati Thakur Narendra Modi
Maratha Reservation : 'मी जोपर्यंत आमदार तोपर्यंत कुणालाही आदिवासींमध्ये घुसू देणार नाही', शिंदेंच्या शिलेदाराचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com