एकनाथ शिंदेंची पुन्हा कमाल! दुसरी जागाही बिनविरोध; यवतमाळची आमदारकी पक्की

Political News : यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातून बुधवारीच काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांनी माघार घेतली होती. त्यामुळे याठिकाणी तीन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
Ekanth Shinde
Ekanth Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या १७ जागेसाठी निवडणूक होत आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याची उत्सुकता लागली होती. त्याचवेळी ठाण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आले आहेत तर आता यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले आहेत.

यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातून बुधवारीच काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांनी माघार घेतली होती. त्यामुळे याठिकाणी तीन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महाविकास आघाडी अपक्ष उमेदवाराला पाठींबा देऊन निवडणूक रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न सुरु होता, त्यासाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला यास आले नाही. गुरुवारी तीन अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे या ठिकाणची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Ekanth Shinde
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत 'टस्सल': कोण, कुठे उमेदवार? संख्याबळ कोणाच्या बाजूने? वाचा एका क्लिकवर

यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातून एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून यावेत यासाठी मुंबईतून खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूत्रे हलवली. सुरुवातीला या ठिकाणी मंत्री संजय राठोड यांच्या पत्नीला दिलेली उमेदवारी त्यांनी रद्द केली तर त्यानंतर माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देत त्यांना बिनविरोध निवडून आणले.

Ekanth Shinde
Parbhani Hingoli MLC election : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत बंडखोरांची 'एन्ट्री'! महायुती अन् मविआचे गणित बिघडणार; निवडणुकीत कोणाला बसणार फटका?

यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातूनही मविआची काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी मिळालेल्या साहेबराव कांबळे यांनी निवडणूक रिंगणातून सपशेल माघार घेतली आहे. कांबळे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होईल, असे वाटत होते. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या साहेबराव कांबळेंनी महाविकास आघाडीकडे निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही, असे म्हणत निवडणुकीतून माघार घेतली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे कांबळे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.

Ekanth Shinde
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत 'टस्सल': कोण, कुठे उमेदवार? संख्याबळ कोणाच्या बाजूने? वाचा एका क्लिकवर

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एकीकडे राज्यातील काही मतदारसंघात महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. ही बंडखोरी मागे घेण्याचे आव्हान महायुतीसमोर असताना शेवटच्या दिवशी महायुतीने कमाल केली आहे. यवतमाळसह अन्य काही ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.

Ekanth Shinde
Yavatmal-Washim MLC election: काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच शस्त्र टाकली; उमेदवारीसाठीच्या ‘रसद’मुळे विधानपरिषदेच्या मैदानात बॅकफूटवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com