ZP Election Update : जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने निर्णय कळवला; इच्छुकांची धडधड वाढली

Election Commission Supreme Court Hearing : काही जिल्हा परिषदांमध्ये ५० आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
ZP election
ZP election sarkarnama
Published on
Updated on

ZP Election News : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणूकीचा निकाल 21 तारखेला असतानाच जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांविषयी सुप्रीम कोर्टात 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

28 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलंडल्या संबंधित सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने निवडणूक घेतली तरी ती कोर्ट जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या आधीन ही निवडणूक असेल असे जाहीर केले. त्यामुळे नगपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणूकीत काही जागा, नगराध्यक्षपदाची निवडणूक मतदानाला दोन दिवस बाकी असताना स्थगिती केली होती. आता त्या ठिकाणी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

राज्यातील तब्बल 20 जिल्हा परिषदांनी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदेच्या निवडणूका 21 जानेवारीच होणार आहे. त्यातही कोर्ट काय निर्णय देणार त्यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांची धडधड वाढली आहे.

'

ZP election
Ahilyanagar Mali Wada issue : पुरातन वेस हटवण्याची चार मंडळांची मागणी; समाजकंटक राजकारणीचा डाव, हरकतींतूनच होताय महापालिका प्रशासनावर प्रहार

या ZP त आरक्षणाची मर्यादा ओलांडली

आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या नांदेड, अमरावती, अकोला, वाशीम , बुलडाणा, ठाणे, पालघर, नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव, हिंगोली, यवतमाळ,नागपूर,चंद्रपूर, वर्धा,गडचिरोली या जिल्हा परिषदां समावेश आहे.

ZP election
District Collector minister meeting rule : जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावा.., आता मंत्र्यांच्या आदेशाला देवाभाऊंची कात्री!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com