NagarPalika Election : 40 नगरपालिका अन् 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली : निवडणुका पुढे जाणार? वाचा सविस्तर यादी

ZP Election Supreme Court Verdict : 50 टक्के आरक्षणाची मर्यादा स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत ओलांडल्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट निकाल देत आहेत.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Local Body Election 2025 : महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यासाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार. पण त्यापूर्वीच जवळपास 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींची निवडणूक कार्यक्रम पुढे जाण्याची शक्यता आहे. याठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने हा निवडणूक कार्यक्रम स्थगित होऊन पुन्हा नव्याने कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आज यावर सुनावणी होणार आहे.

स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. यावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडे बोल सुनावत आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नसल्याचे म्हटले होते. जिथे आरक्षणाची मर्यादा ओलांडली अशा ठिकाणची निवडणूक स्थगित करू असे इशारा कोर्टाने दिला होता. तसेच कुठेकुठे आरक्षणाची मर्यादा ओलांडली याची आकडेवारी सादर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे सरकार आज आकडेवारी सादर करणार आहेत. त्यावर कोर्ट निर्णय घेईल.

सरकारच्या आकडेवारीनुसार, 57 नगरपरिषद आणि नगरपंचायती, 17 जिल्हा परिषद, 83 पंचायत समित्या आणि 2 महापालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलंडल्याचे समोर आले आहे.

Supreme Court
Maharashtra Politics: होऊ दे खर्च! फडणवीस, शिंदे, अजितदादांकडून प्रत्येक नगरपालिकेसाठी 10 कोटीचं बजेट?

नगरपालिका :

अमरावती - चिखलदरा, दर्यापूर

यवतमाळ - आर्णी, यवतमाळ

नांदेड - बिलोली, धर्माबाद, कुंडलवाडी, उमरी

परभणी - पूर्णा

पालघर - जव्हार

भंडारा - साकोली-शेंदूरवापा

चंद्रपूर - बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, घुग्घूस, नागभीड, राजुरा

गडचिरोली - आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली

नागपूर - बुटीबोरी, दिगडोह (देवी), कामठी, काटोल, खापा, उमेरड, कन्हान-पिंपरी, वाडी

वर्धा - पुलगाव

अहिल्यानगर - शिर्डी

धुळे - पिंपळनेर

नंदुरबार - नवापूर, तळोदा

नाशिक - मनमाड, इगतपुरी, ओझर, त्र्यंबक

पुणे - दौंड

Supreme Court
BJP vs Shivsena : '2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे,' म्हणणाऱ्या रवींद्र चव्हाणांना शिंदेंचं प्रत्युत्तर म्हणाले; 'केंद्रात आणि राज्यात...'

नगरपंचायत :

अमरावती - धारणी

वाशिम - मालेगाव

यवतमाळ - ढाणकी

पालघर - वाडा

चंद्रपूर - भिशी

गोंदिया - गोरेहाव, सालेकसा

नागपूर - बेसा पिपळा, भिवापूर, गोधनी रेल्वे, कंद्री कन्हान, बीडगाव-तरोडी-पांढुर्णा, महादुला, मौदा पंचायत, निलडोह, येरखेडा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com