सुषमा स्वराज म्हणाल्या, ऐसा कॉन्फरन्स हॉल तो हमारे यहां भी नही

लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या असताना २००७ मध्ये सुषमा स्वराज्य गेवराई बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आणि बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पहिल्या संगणकीय शाखेच्या उद॒घाटनासाठी आल्या होत्या. त्यांच्या समवेत दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे, शत्रुघ्न सिन्हा व रावसाहेब दानवे होते.
amarsing-sushamaji
amarsing-sushamaji
Published on: 
Updated on: 

बीड : लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या असताना २००७ मध्ये सुषमा स्वराज्य गेवराई बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आणि बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पहिल्या संगणकीय शाखेच्या उद॒घाटनासाठी आल्या होत्या.

सार्वजनिक क्षेत्रातील मोठे काम, तरुण व महिलांमध्ये लोकप्रिय असल्याने सुषमा स्वराज यांना बोलवावे असा आग्रह मी दिवंगत गोपीनाथराव मुंडेंकडे धरला. त्यानुसार सुषमा स्वराज आल्या आणि त्यांनी कामांचे कौतुकही केले. विशेष म्हणजे बाजार समितीमधील अत्याधुनिक कॉन्फरन्स हॉल पाहून ‘अमरसिंह हमारे यहां भी ऐसा हॉल नही’ असे मिश्किलपणे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. 

विशेष म्हणजे मुख्य कार्यक्रमानंतर घाई असल्याने दहा मिनीटांत जेवण उरकुन त्यांना निघायचे होते. परंतु, गढी (ता. गेवराई) येथील भवानी मंदिर परिसरातील वातारवण प्रसन्न वाटल्याने त्या सव्वा तास थांबल्या.
 
२००७ मध्ये मी भाजपचा  गेवराई मतदार संघाचा  आमदार होतो . त्यावेळी मी  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षही होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रथमच संगणकीय प्रणालीचा अवलंब करत गेवराईच्या बाजार समितीमधील शाखेत प्रथमच ही प्रणाली सुरु करण्यात आली होती.  त्यावेळी  कृषी उत्पन्न बाजार समितीने नव्यानेच उभारलेल्या प्रशासकीय इमारत व शिवाजीराव दादा पंडित व्यापारी संकुलाचेही लोकार्पण करावयाचे होते. 

त्या काळात लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांची लोकप्रियता प्रचंड होती. तरुण व महिलांमध्ये त्यांची क्रेझ पाहून त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा होती. त्यामुळे स्वराज  यांना आणाच असा आग्रह मी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे धरला. मुंडे यांनीही स्वराज्य यांच्यासह फायरब्रँड नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनाही सोबत आणले. गेवराईचा काही भाग त्यावेळी जालना लोकसभेच्या कार्यक्षेत्रात असल्याने रावसाहेब दानवेही सोबत आले. 

त्यांच्या हस्ते दोन्ही कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडले. त्यानंतर सुषमा स्वराज, दिवंगत मुंडे, शत्रुघ्न सिन्हा, दानवे आदी मंडळी बाजार समितीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बसले. ग्रामीण भागातील आणि शेतीशी संबंधीत संस्थेचा हा अत्याधुनिक हॉल पाहून ‘अमरसिंह, ऐसा हॉल तो हमारे यहां भी नही होता’ असे सुषमा स्वराज्य म्हणाल्या होत्या . दरम्यान, या मुख्य कार्यक्रमानंतर जवळच असलेल्या गढी येथील भवानी मंदिर परिसरात नेत्यांसह शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांना पुढील कार्यक्रमांना जाण्याची घाई असल्याने जेवणाचा कार्यक्रम दहा मिनिटांत उरकण्याच्या त्यांच्याच सुचना होत्या. परंतु, मंदिर परिसरातील प्रसन्न वातावरण पाहून त्या सव्वा तास थांबल्या होत्या . 

( शब्दांकन : दत्ता देशमुख )
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.