मंगरूळ ता. चांदवड) : येथील शेतकरी अशोक निरभवणे यांची कन्या करुणा व कोकणखेडे येथील बाळू एळींजे यांचा मुलगा संदीप यांचा विवाह आज (ता. ११ जून) मंगरूळ येथे पार पडला. एकीकडे लग्नाची रेलचेल तर दुसरीकडे पेरण्यांची लगबग. एकीकडे सनई चौघाड्यांचे सूर तर दुसरीकडे पावसापूर्वी होणारा ढगांचा गडगडाट सुरू होता. अशात जोराचा पाऊस आलाच तर सासऱ्यांची पुढील काही दिवस पेरणी खोळंबेल, लग्न तर लागलं मग पेरणी करण्यास काय हरकत आहे, असा विचार करून नवरदेव संदीप याने लगेचचं शेत गाठत औत धरला. सर्जा-राजाच्या साथीने संदीप व करुणा या नवं-दाम्पत्याने भुईमूग पेरणी केली.
माहेर सोडून सासरी जातांना लेक कष्टकरी बापाच्या शेतात हिरवी स्वप्न पेरून गेल्याने लेकीला निरोप देताना माहेरवासीय भारावून गेलेत. पेरणी होताच पावसाने जोरदार हजेरी लावली अन जावयाने केलेली पेरणी पथ्यावर पडल्याने सर्वच माहेरच्या मंडळींच्या चेहऱयावर हलकेच हसू उमटले.
चांदवड तालुक्यात सध्या शेतकऱ्यांची पेरणीची मोठी लगबग सुरू आहे, अशात आज एकाबाजुला लग्न पार पडत होते तर दुसरीकडे पावसाचे वातावरण झाल्याने नवरीच्या वडिलांनाही पेरणीची काळजी लागून होती. अशात नवरा-नवरीने पेरणी करण्याचा निर्णय घेतल्याने आम्हा सर्वांना शेतीला प्राधान्य देणाऱ्या या दाम्पत्याच्या अभिमान वाटला.
-वाल्मिक वानखेडे, नवरीचे मामा
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.