Kolhapur News: सतेज पाटलांनी दिवाळीची पहिली आंघोळ केली थेट पाइपलाइनच्या पाण्याने!

MLA Satej Patil : कोल्हापूरकरांचे कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण...
Kolhapur News MLA Satej Patil
Kolhapur News MLA Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : नऊ वर्षांपासून कोल्हापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. ते थेट पाइपलाइनचे पाणी अखेर कोल्हापुरात दाखल झाले. आमदार सतेज पाटील यांच्यासह शहरवासीयांचे कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. पाणी पुईखडी पंपिंग स्टेशनला येताच कोल्हापुरात दिवाळी साजरी झाली. पाणी आल्याने यंदाच्या दिवाळीत थेट पाइपलाइनच्या पाण्याने अभ्यंगस्नान होणार आहे.

कोल्हापूर शहराला पुरेसा, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातून थेट पाइपलाइन योजना आखण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला होता. गेली आठ, नऊ वर्षे या योजनेचे काम सुरू होते. त्यामध्ये अनेक अडथळे आले होते.

Kolhapur News MLA Satej Patil
Sanjeev Thakur: ललित पाटील प्रकरण भोवलं; 'ससून'चे डीन संजीव ठाकूर यांची उचलबांगडी

गेल्या दोन वर्षांपासून थेट पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर सुरू होते. कोणत्याही परिस्थितीत दिवाळीला अभ्यंग स्नान घालण्याची घोषणा नेत्यांनी केली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे पाणी येऊ शकले नव्हते. मात्र, आज रात्री अकरा वाजता थेट पाइपलाइनचे पाणी पुरी कडी आले. याची माहिती कोल्हापूर शहरात पसरल्यानंतर दिवाळी साजरी करण्यात आली.

MLA Satej Patil
MLA Satej Patil Sarkarnama

आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले असून, नऊ वर्षांनी त्यांची स्वप्नपूर्ती झाली. त्याची माहिती मिळताच आमदार सतेज पाटील यांनी रात्री अकरा वाजता पुईखडी पंपिंग स्टेशनला भेट देत आनंद उत्सव साजरा केला. मदार पाटील यांना याचा इतका आनंद झाला, की त्यांनी थेट दिवाळीपूर्वी पहिली आंघोळ थेट पाइपलाइनच्या पाण्याने केले. शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वप्नपूर्ती झाल्याने त्यांना गुलालात नाहून काढले. या वेळी आमदार ऋतुराज आणि जयश्री जाधव उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते जलशुद्धीकरण केंद्रात काळम्मावाडीच्या पाण्याचं विधिवत पूजन करण्यात आले. या वेळी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर हलगीच्या ठेक्यावर आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सर्वांनीच जल्लोष साजरा केला .

देवीच्या चरणी वाजत-गाजत थेट पाइपलाइनचे पाणी

कोल्हापूर शहरात पाइपलाइन येतात, त्यांचा आनंद सर्व कोल्हापूरवासीयांना होता. सुवासिनींनी हे पाणी कलशामध्ये भरून, करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी अर्पण केले.

माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण

कोल्हापूरकरांना कायमस्वरूपी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळवून दिल्याचा आनंद आणि आत्मिक समाधान मिळालं. या योजनेसाठी अनेक अडचणी आणि संकटांवर मात करत केलेले प्रयत्न आणि पाठपुराव्याला यश मिळालंय . त्यामुळे आपल्याला आत्मिक समाधान लाभत असून, हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे.

Edited By : Mangesh Mahale

Kolhapur News MLA Satej Patil
Thorat Vs Vikhe : विखे, पाटलांची साखर विरोधकांना कडू? 'सायलेंट व्होटर'साठी रणनीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com