शिवसेना इच्छुकासह खासदार संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना भेटले! 

विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या इच्छुकांत दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे आपल्याला उमेदवारी निश्‍चित असल्याचा दावा करीत आहेत. यातच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेचे दुसरे इच्छुक शिवाजी सहाने यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली.
शिवसेना इच्छुकासह खासदार संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना भेटले! 
Published on: 
Updated on: 

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या इच्छुकांत दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे आपल्याला उमेदवारी निश्‍चित असल्याचा दावा करीत आहेत. यातच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेचे दुसरे इच्छुक शिवाजी सहाने यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली. यामुळे निवडणुकीला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता लक्षात घेता शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. 

भाजपचे राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेचे सहाणे यांसह काही नेत्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीतील चर्चेचा तपशील गोपनिय असल्याचे सांगण्यात येते. मात्र, भाजपतर्फे नारायण राणे यांची इच्छुक म्हणुन चर्चा होती. त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने सहाणे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते. गेल्या निवडणुकीत सहाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत जाधव यांना समसमान मते मिळाली होती. लॉटरी सोडतीत जाधव यांनी विजयी घोषीत करण्यात आले. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यात सहाणेंच्या बाजूने निकाल लागला. मात्र, आमदार जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यात कालापव्यय झाला. या अन्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणुन सहाणे उमेदवारीसाठी धडपड करीत आहेत. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीने राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. 

विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघाची निवडणुक येत्या मे महिन्यात होत आहे. निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसा राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना- भाजप यंदा स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेला या मतदारसंघात सतत अनुकुलता असुनही यश सतत हुलकावणी देत आले आहे. यंदा सर्वाधीक 199 मतदारसंख्या शिवसेनेकडे आहे. त्यादृष्टीने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्थानिक नेते व इच्छुकांच्या बैठकीत यावर चार तास खल झाला. त्यात जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना गाठीभेटी सुरु करण्याच्या सुचना दिल्याचे बोलले जाते. दराडे यांनी नगरसेवक, लोकप्रतिनिधींशी संपर्क सुरु केला आहे. असे असतांनाच दुसरे इच्छुक शिवाजी सहाणे यांनीही मालेगाव महापालिकेतील मतदारांशी गाठीभेटी सुरु करुन प्रचाराला प्रारंभ केला. त्यामुळे शिवसेनेत विसंवाद निर्माण झाला आहे. 


गेल्या निवडणुकीत माझ्यावर अन्याय झाला. यंदा शिवसेनेकडे उमेदवारी मागीतली आहे. शिवसेनेने उमेदवारी दिल्यास भाजपने सहकार्य करावे ही विनंती मुख्यमंत्र्यांना केली.

- शिवाजी सहाणे, माजी नगरसेवक. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com