पंजाबमध्ये पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री झाला अन् मायावती भडकल्या...

चरणजितसिंग चन्नी यांच्या रुपाने पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. यावर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती भडकल्या आहेत.
पंजाबमध्ये पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री झाला अन् मायावती भडकल्या...
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग यांना हटवून त्यांच्या जागी चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना आणण्यात आले आहे. चन्नी यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. चन्नी यांच्या रुपाने पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. यावरून बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सर्वेसर्वा मायावती (Mayawati) यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे.

मायावती यांनी नवीन मुख्यमंत्री चन्नी यांनी शुभेच्छा दिल्या असून, त्यांना काँग्रेसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. मायावतींनी म्हटले आहे की, दलित मुख्यमंत्री नेमणे ही निवडणुकीसाठीची रणनीती आहे. दलित समाजाच्या मतांवर डोळा ठेवून केवळ काही महिन्यांसाठी चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. निवडणुकीतील फायदा डोळ्यासमोर हा निर्णय घेणाऱ्या काँग्रेसचा खरेतर दलितांवर विश्वास नाही. केवळ अडचणीत आल्यानंतर त्यांना दलितांची आठवण येते. आता पंजाबमधील नागरिकांना काँग्रेसपासून सावध राहावे.

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा शपथविधी आज झाला. चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता. राहुल गांधी हे आजच्या शपथविधीसाठी राजभवनावर हजर होते. त्यामुळे ते राज्यातील राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सुरवातीला मुख्यमंत्रिपदासाठी माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात होते. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी जाखड यांना त्यावर पाणी सोडावे लागले होते. ते सध्या आमदार नाहीत. त्यांनी तीनवेळा अबोहार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, पंजाब विधानसभेत ते 2012-2017 या काळात विरोधी पक्षनेते होते. यानंतर 2017 मध्ये ते गुरदासपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अभिनेते सनी देओल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. पण जाखड यांच्या नावाला आमदारांनी विरोध केला होता.

पंजाबमध्ये पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री झाला अन् मायावती भडकल्या...
कॅप्टन नाही अन् सिद्धूही नाही! राहुल गांधींनी मारले एकाच दगडात दोन पक्षी

प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना अमरिंदरसिंग यांचाच विरोध होता. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून सिध्दू यांना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले गेले नाही. तसेच, प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड केल्यानं त्यांचे नाव शर्यतीत मागे पडले. तर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर रंधवा यांच्या नावावर चर्चा झाली होती. अखेर चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com