IT Notice to Abu Azmi : अबू आझमींकडून 160 कोटींची करचुकवेगिरीचा आरोप; 20 एप्रिलला चौकशीला बोलवलं

राज्यासह देशभरातील विरोधी पक्षनेत्यांच्या मागे ईडी, आयकर, सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama

Income tax Summons to Abu Azami : राज्यासह देशभरातील विरोधी पक्षनेत्यांच्या मागे ईडी, आयकर, सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यातून अनेकजणांना तुरुंगातही जाव लागलं. अशातच आता आणखी एक नेता आयकर विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. राज्यातील समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azami) यांना आयकर विभागाच्या वाराणसी शाखेने 160 कोटी रुपयांच्या करचोरी आरोपांच्या प्रकरणी आझमी यांना समन्स बजावले असून २० एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

वाराणसीतील विनायक ग्रुपमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी आझमी यांना चौकशीचं समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षांत अबू आझमी यांनी वाराणसी ते मुंबईपर्यंत हवालाच्या माध्यमातून 40 कोटी रुपये मिळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आयकर विभागाकडून (Income Tax) वाराणसीतील विनायक ग्रुपची चौकशी सुरु होती. या चौकशीत अबू आझमी यांचंही नाव समोर आलं. यामुळे आता त्यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे.

Abu Azmi
BREAKING News: नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा 'वेट अँड वॉच'; सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी नाहीच...

विनायक ग्रुपने वाराणसीत अनेक इमारती, शॉपिंग सेंटर आणि मॉल तयार केले आहेत. विनायक ग्रुपमध्ये समीर दोषी, आभा गुप्ता आणि सर्वेश अग्रवाल हे पार्टनर आहेत. आभा गुप्ता या गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत, तर गणेश गुप्ता हे अबु आझमी यांचे निकटवर्तीय मानले जातात. गुप्ता हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील महासचिव होते. पण गणेश गुप्ता यांचे अचानक निधन झाले. मुंबईतील कुलाबा येथील अबू आझमी यांच्या इमारतीत गुप्ता यांचे कार्यालय होते.

चौकशीदरम्यान, आयकर विभागाने तिघांचेही जबाब नोंदवत, त्यांच्या इमेलचीही पडताळणी केली. यात विनायक ग्रुप हा चार जणांमध्ये विभागण्यात आल्याचे आढळून आले. ग्रुपला झालेल्या फायद्याचे चौथा भाग हा अबू आझमींना मिळायचा.विनायक ग्रुपला 2018 ते 2022 या पाच वर्षांच्या कार्यकाळात 200 कोटी रुपयांची कमाई झालीय.यातील 160 कोटी रुपयांच्या खुलासा समोर आला असून उर्वरित 40 कोटी रुपये आझमींना हवालाच्या माध्यमातून पाठल्याचेही तपासतून समोर आले आहे.

अबू आझमी यांचा फ्रंटमॅन अशी ओळख असलेले अनीस आझमी हे त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार करतात. अनीस यांच्या माध्यमातूनच आझमींना हवाला ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवल्याच त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. आता या प्रकरणात आझमी यांना चौकशीचे समन्स पाठवण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com