1800 एसटी बसेस बुक; प्रती किलोमीटर 56 रुपये भाडे : दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधींचा चुराडा

शिवसेनेत (Shiv Sena) फुट पडल्यानंतर आता दसरा मेळाव्यावरुन रान पेटले आहे.
Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
Eknath Shinde News, Uddhav Thackeray NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेत (Shiv Sena) फुट पडल्यानंतर आता दसरा मेळाव्यावरुन रान पेटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. दोन्ही गटाकडूंन मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे.

मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांना मुंबईत येण्यासाठी मोठ्या प्रमाणात एसटीच्या गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. एसटीच्या सूत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार महामंडळाच्या 1800 बसेस बुक करण्यात आल्या आहेत. यासाठी साधारण शिंदे गटाने १० कोटी रुपये भरल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे.

Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
दसरा मेळ्याला जाणाऱ्या गाड्यांचा अपघात; ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या...

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एसटी बसच्या बुकींगसाठी एका किलोमीटरला 56 रुपये भाडे आकारले जाते. साधारण एका बसमध्ये ५० जण बसतात त्यानुसार जवळपास राज्यभरातून 90 हजारांच्या जवळपास कार्यकर्ते येणार आहेत, असे सांगितले जात आहे. तसेच खासगी बसेस आणि चार चाकी वाहनेही मोठ्या प्रमाणात बुक करण्यात आल्याचा दावा शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे.

Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
दररोज सकाळी बांग देणारेही आता जेलमध्ये गेलेत : विखे पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल

शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी आहे. कृषी मंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुमारे 25 ते 30 हजार कार्यकर्ते घेऊन आपण बीकेसी मैदानावर दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. तर शंभूराज देसाई यांनी १५ हजार कार्यकर्ते साताऱ्यातून येणार असल्याचे सांगितले आहे. शिंदे गटाचा मेळावा होणाऱ्या बीकेसी मैदानावर साधारण एक लाख लोक बसू शकतात. तर शिवाजी पार्क मैदानावर ८० ते ९० हजारांची क्षणता असल्याचे सांगितले जाते. मात्र, दोन्ही गटांकडून लाखो लोक येणार असल्याचा दावा केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com