दसरा मेळ्याला जाणाऱ्या गाड्यांचा अपघात; ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या...

Shivsena : ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.
Accident News, Dasara Melava News
Accident News, Dasara Melava News Sarkarnama

दौलताबाद : उद्या मुंबईत मुख्यमंत्री शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जात शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील गाड्याचा अपघात झाला आहे. दौलताबाद येथील समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला असून ताफ्यातील ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याची माहिती मिळत आहे.

Accident News, Dasara Melava News
Aurangabad : दसरा मेळावा शिंदेंचा, शक्तिप्रदर्शन सत्तारांचे

परवानगी नसतांना समृद्धी महामार्गावरून गाड्या नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामध्ये गाड्यांचे थोडेफार नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गाड्यामधे असलेल्यांना दुखापत झाली का नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील या गाड्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटात मोठी चुरस लागली आहे. यामुळे शिवसेनेच्या परंपरागत असलेल्या दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटामध्ये चढाओढ लागली आहे.

Accident News, Dasara Melava News
अजितदादांच्या सोसायटीधारकांच्या संवादावरून भाजप - राष्ट्रवादीत जुंपली...

शिवसेनेचा दसरा मेळावा सालाबादप्रमाणे यंदाही शिवतीर्थावरच होणार असून शिंदे गटाचा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे. आता या दोन्ही मेळाव्यास गर्दी जमवण्यासाठी मोठी कसरत केली जात आहे. यामध्ये शिंदे गटाच्या मेळाव्याला बीकेसी मैदावर ३ लाखांहून जास्त गर्दी जमेल, असा विश्वास शिंदे गटाचकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शिंदे गटाचे नेते हे राज्यभरातून आपल्या समर्थकांकडून बीकेसी मैदानावर पोचण्यासाठी आजच निघाले आहेत. यामध्ये जालन्यातील अर्जुन खोतकरही आपल्या ताफ्यासह निघाले होते. मात्र, त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. यामध्ये कुठलीही जीवीत हानी झाली नसून गाड्याचे मात्र नुकासान झाल्याची माहिती मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com