Khichdi Vatap Scam: खिचडी वाटप गैरव्यवहारात मोठी अपडेट ; पालिका अधिकाऱ्यांसह इतरांना २ कोटी...

Maharashtra Politics : खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सुरज चव्हाण यांची 22 ऑगस्ट रोजी 6 तास चौकशी केली होती.
Khichadi Scam :
Khichadi Scam : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Scam News: कोरोना महामारी काळातील खिचडी वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खिचडी घोटाळा प्रकरणात महापालिका अधिकारी आणि इतर आरोपांना दोन कोटी रुपये मिळाल्याचा आरोप आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आरोपीना चौकशीसाठी बोलवले जाणार आहे.

Khichadi Scam :
Maratha Protest Baramati : 'सरकारचा भरला घडा, अजितदादा सत्तेतून बाहेर पडा'; बारामतीकरांचे आवाहन

दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने खासदार संजय राऊत याचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यासह बाळा कदम, राजू साळुंखे, फोर्सवन मल्टीसर्व्हिसेस भागिदारी आणि स्नेहल कॅटरर्स तसेच माजी सहाय्यक पालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक आणि कट रचणे, या कलमांर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्यावर 6.37 कोटी रुपयांचा गैरव्यवहाराचाही आरोप आहे. बेकायदेशीरपणे खिचडी बनवण्याचे कंत्राट मिळवून त्याचे अनधिकृत सब कॅट्रॅक्टिंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

Khichadi Scam :
Maratha Reservation News : मराठा मोर्चातून काँग्रेस आमदारांना बाहेर काढले ; हंबर्डे, राजूरकरांवर मराठा युवक संतापले..

फोर्सवन मल्टीसर्व्हिसेस भागिदारी आणि स्नेहल कॅटरर्स यांच्याकडून कोव्हिड काळात वाटप करण्यात आलेली खिचडीची पाकिटे वजनाने कमी होती, असे चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.त्यासोबतच या प्रकरणात कंत्राट मिळवून देण्यासाठी सुजीत पाटकरांनी सल्लागार सेवेच्या नावाखाली ४५ लाख रूपये मिळाल्याचा दावाही आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. त्यामुळे या संशयितांच्या खात्यांची तपासणी करून त्यात तथ्य आढळल्यास त्यांना चौकशीसाठी बोलवली जाणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले. खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सुरज चव्हाण यांची 22 ऑगस्ट रोजी 6 तास चौकशी केली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com