School Exam: शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पास होणं बंधनकारक

Maharashtra School Exam: पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा होणार
Maharashtra School Exam:
Maharashtra School Exam:Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत यापुढे आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा करत यापुढे आता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

यापुढे आता पाचवी आणि आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची परीक्षा होणार आहे. यापुढे राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित सर्व शाळांना हा नियम लागू असणार आहे. आधी बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क या कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नव्हते.

Maharashtra School Exam:
Nana Patole News: सत्तेत आल्यास सरकारच्या पैशातून कारखान्याची चिमणी बांधून देणार; 'सिद्धेश्वर'च्या संचालकांना नाना पटोलेंचं आश्वासन

पण त्यामुळे विद्यार्थ्यांचे अनेक विषयांकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले. तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेत होऊ लागल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामध्ये अपयश येताना दिसून आले. त्यामुळे या सर्व गोष्टी पाहाता आता राज्याच्या शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेत हा बदल केला आहे.

Maharashtra School Exam:
Nana Patole On CM Shinde : '' मुख्यमंत्र्यांनी भाजपपासून जरा सावधच राहावं...''; पटोलेंचा शिंदेंना सल्ला

नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा होणार

राज्याच्या शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेत यापुढे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाले तर त्यांना पुन्हा पुनर्परीक्षा देण्याची संधी उपल्बध खरून देण्यात येणार आहे. पण तरी देखील त्यांना त्यात यश आलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना आहे त्याच वर्गात प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाही, असा मोठा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com