Solapur, Madha Vote counting : मतमोजणी केंद्रासह सोलापुरात 2000 पोलिसांचा बंदोबस्त; रामवाडी गोदाम परिसरात जमावबंदी

Lok Sabha Eelection 2024 : गोदामाच्या 100 मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश निकाल जाहीर होईपर्यंत लागू करण्यात आला आहे. तसेच, विना परवानगी मिरवणुका, रॅली काढण्यावर निर्बंध असणार आहेत.
 Police Deployment
Police DeploymentSarkarnama

Solapur, 03 June : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सोलापूर शहरातील रामवाडीतील शासकीय गोदामात उद्या (ता. 4 जून) सकाळी आठपासून सुरू होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी सोलापूर शहरात सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. गोदामाच्या 100 मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश निकाल जाहीर होईपर्यंत लागू करण्यात आला आहे. तसेच, विना परवानगी मिरवणुका, रॅली काढण्यावर निर्बंध असणार आहेत.

सोलापूर (Solapur) आणि माढा (Madha) लोकसभा मतदारसंघाच्या (Lok Sabha constituency) मतमोजणीसाठी रामवाडी गोदाम परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित फिरण्यावर निर्बंध असणार आहेत. सोलापूर शहरात (Solapur City) सुमारे दोन हजार पोलिस बंदोबस्तासाठी असणार आहेत. यात काही पोलिस अधिकारी व कर्मचारी हे साध्या वेशात शहरात फिरणार आहेत. सोलापुरात ‘एसआरपीएफ’ची एक तुकडीही दाखल झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कायदा हातात घेऊन सोलापूर शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडेल, असे कृत्य कोणी करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. परवानगीशिवाय विजयी मिरवणुका किंवा रॅली काढण्यास बंदी असणार आहे. विना परवाना मिरवणूक काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

रामवाडी गोदाम परिसराच्या शंभर मीटर अंतरात कलम 144 लागू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये. त्या ठिकाणी कोणी आल्यास पोलिस त्यांच्यावर कारवाई करू शकतात.

 Police Deployment
Nana Patole : लोकसभेच्या निकालानंतर नाना पटोलेंची कॉलर दिल्लीत टाईट होणार?

लोकसभेचा निकाल ऐकण्यासाठी सोलापूर शहरात तीन ठिकाणी सोय करण्यात आली आहे. जांबवीर चौकातील स्पिकरवरून लोकांना पाच कंदिल चौक, मोदी चौकी, मसिहा चौकापर्यंत निकाल ऐकता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि भाजपकडून राम सातपुते, तर माढ्यात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्या दोन्ही बाजूने तुल्यबळ लढाई झाली आहे, त्यामुळे सोलापूर आणि माढ्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

 Police Deployment
Jayant Patil : मतमोजणीला अवघे काही तास उरले असताना जयंत पाटलांनी व्यक्त केली 'ही' भीती; ‘चंदीगडप्रमाणे...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com