Mahavikas Aaghadi: 'महाविराट' मोर्चाबाबत मोठी अपडेट! पोलिसांनी आघाडीच्या नेत्यांना केली 'ही' विनंती

Mahavikas Aaghadi: मुंबई पोलिसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर नवीन प्रस्ताव
Mahavikas Aghadi, uddhav thackeray, nana patole, ajit pawar
Mahavikas Aghadi, uddhav thackeray, nana patole, ajit pawarsarkarnama

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक आणि वादग्रस्त विधानं, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागातील गावांवर केलेला दावा, चिथावणीखोर वक्तव्य, महाराष्ट्राबाहेर जाणारे उद्योग प्रकल्प यांसह विविध मुद्दय़ांवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi ) एकवटली असून आक्रमक पवित्रा देखील घेतला आहे. आघाडीच्या वतीने मुंबईत १७ डिसेंबर रोजी शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध एल्गार पुकारला असून महाविराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आता याच मोर्चाविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.

Mahavikas Aghadi, uddhav thackeray, nana patole, ajit pawar
Raj Thackeray : राज ठाकरेंची मध्यस्थी; ११ पोलिसांचे निलंबन मागे अन् ३०७ कलमही रद्द

शिवसेना पक्षप्रमुख ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महाविराट मोर्चाचे काढला जाणार आहे. यात आघाडीतील घटक पक्षांसह सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन देखील आघाडीतील नेत्यांनी केलं आहे. या मोर्चाची सुरुवात भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून सुरु होणार असून समारोप आझाद मैदानात होणार आहे. यावेळी सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

Mahavikas Aghadi, uddhav thackeray, nana patole, ajit pawar
Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरचे टोलचे दर जाहीर; आकडे वाहनचालकांना फोडणार घाम

मात्र, महाविराट मोर्चाबाबत मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. मोर्चाच्या सुरुवातीचे ठिकाण बदलण्याची विनंती या प्रस्तावात मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीकडे केली आहे. तसेच भायखळा येथील रिचर्डसन क्रूडास कंपनी येथून मोर्चाची सुरुवात करावी असं म्हटलं आहे.

महाविकास आघाडी नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत महाविराट मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. आता महाविकास आघाडीचे नेते मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष सर्वाचेंच लक्ष लागलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com