Ashwajeet Gaikwad : गर्लफ्रेंडच्या अंगावर गाडी घालणं भोवलं; 'MSRDC' अधिकाऱ्याच्या मुलासह 3 जणांवर गुन्हा

Thane Crime News : या घटनेत अश्वजीत हा विवाहित असल्याचं समोर आल्यानंतर त्या युवतीने...
Ashwajeet Gaikwad
Ashwajeet GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Thane News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका बड्या अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अश्वजीत गायकवाड हा विवाहित असल्याचं समोर आल्यानंतर त्या युवतीने जाब विचारल्यानंतर हा प्रकार घडला.या घटनेची राज्य महिला आयोगाने तत्काळ गंभीर दखल घेतली होती.आता यानंतर अश्वजीत गायकवाडला प्रेयसीच्या अंगावर गाडी घालणं भोवणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी गायकवाडवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी प्रिया सिंहने दिलेल्या तक्रारीनुसार, कासारवडवली पोलिसांनी अश्वजीत गायकवाड (Ashwajeet Gaikwad) यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.अश्वजित गायकवाड यांच्यासोबत गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा पीडितेने केला आहे.

Ashwajeet Gaikwad
Maharashtra Assembly Winter Session : अशोक चव्हाणांनी लक्ष वेधताच मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले 'हे' आश्वासन

कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अश्वजीत गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर साळुंखे यांचा समावेश आहे.पोलिसांनी बेदरकारपणे वाहन चालविणे,धमकावणे,इतरांच्या जिवितास किंवा व्यक्तीगत सुरक्षिततेला धोका पोहचवणे अशी कलमे लावण्यात आली आहेत.या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

घोडबंदर येथील कासारवडवली भागातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमआरडीसी) एका प्रशासकीय अधिकारी असलेल्या अधिकाऱ्याचे मुलाने 26 वर्षीय प्रिया सिंह नावाच्या अंगावर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या घटनेतील पीडितेने समाजमाध्यमांवर न्याय देण्याची मागणी केली आहे.ती फिटनेस ट्रेनर आणि फॅशन प्रमोटर आहे.तसेच नवी मुंबई परिसरात सलुनचा व्यवसाय करते.(MSRDC)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Commission for Women) घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून यासंबंधी कारवाई करून अहवाल मागवला आहे.

महिला आयोगाने मागवला अहवाल...

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट करत या प्रकरणाला वाचा फोडली आहे.त्या म्हणाल्या,ठाणे जिल्ह्यात तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Ashwajeet Gaikwad
Maan Political News : टेंभूचे भूमिपूजन अन॒ जिहे कटापूरचे पाणीपूजन केल्याशिवाय निवडणूक लढविणार नाही : जयकुमार गोरे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com