Mumbai News : मुंबईतील पालघरमधून एक खळबळजनक घटना समोर येत आहे.भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाने प्रेयसीला मित्रांच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. एकीकडे राज्यात कायदा सुव्यवस्थेसह महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्याचं नाव या गंभीर गुन्ह्यात समोर आल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अश्वजीत गायकवाड (Ashwajeet Gaikwad) याने मित्रांच्या सहाय्याने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील पीडित तरुणी जखमी असून मानसिक दडपणाखाली असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची राज्य महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली असून पालघरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांनी दिली आहे. (BJP Palghar)
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट करत या प्रकरणाला वाचा फोडली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय सह-संचालकांचा मुलगा आणि पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीच्या अंगावर कार घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे.
तसेच या घटनेतील पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून पालघरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागविला आहे असेही चाकणकर हे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. पण काही वेळातच चाकणकर यांनी हे ट्विट डिलीट केले आहे.
एमएसआरडीसीचे सह-संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड याने प्रेयसीच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहित असल्याचं बिंग फुटलं म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे.अश्वजीतने प्रेयसीला रात्री तीन वाजण्याच्या सुमारास भेटायला बोलावले. यावेळी त्याने प्रेयसीच्या हाताला चावा घेतानाच शिवीगाळ आणि मारहाण केली.त्यानंतर प्रेयसीला धक्का दिल्याने ती कार खाली सापडून गंभीर जखमी झाली आहे.ही घटना सोमवारी (ता.11) मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.