मोहम्मद पैगंबरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य; भाजप प्रवक्त्यावर मुंबईत गुन्हा दाखल

BJP| Nupur Sharma| नूपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत रझा अकादमीने केला आहे.
Nupur Sharma
Nupur Sharma

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी एफआरआय दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. नूपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी दोन दिवसांपूर्वी टिव्ही चॅनेलवर मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. तर नूपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत रझा अकादमीनेही नूपूर शर्मांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

देशात सध्या ज्ञानवापी मशिदींचा मुद्दा जोर धरु लागला आहे. ज्ञानवापी मशिद प्रकरणी एका टीव्ही डिबेट शोमध्ये नूपूर शर्मा सहभागी झाल्या होत्या. नूपूर शर्मा यांनी या कार्यक्रमात मोहम्मद पैंगबर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे काल दिवसभर चांगलाच गदारोळ झाला होता. नॅशनल कॉन्फरन्ससह विविध मुस्लीम संघटनांकडून देखील नूपूर शर्मा यांचा निषेध व्यक्त केला. तसेच, रझा अकादमीने मुंबई पोलीस आयुक्तांना नूपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिलं होतं.

Nupur Sharma
राणा दांपत्याला शक्तीप्रदर्शन भोवलं; अमरावती पोलिसात गुन्हा दाखल

शनिवारी नॅशनल कॉन्फरन्स च्या नेत्यांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. मुंबईत रझा अकादमी आणि सुन्नी बरेल्वी संघटनेकडून तक्रार करण्यात आली होती. तर दुसरीकडे नूपूर शर्मा यांनीदेखील मुस्लीम संघटनांकडून धमकी येत असल्याचा आरोप केला होता. या सर्व प्रकरणानंतर, मुंबई पोलिसांनी नूपूर शर्मा यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, हैदराबादमध्ये ही नूपूर शर्मा यांच्या विरोधात एमआयएमने तक्रार दाखल केली आहे. नूपूर शर्मा यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी एमआयए कडून करण्यात आली आहे. नूपूर शर्मा यांच्या वक्तव्याने मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याचं एमआयएम नेत्यांचं म्हणणं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com