जमीन खरेदी प्रकरणात 'या' शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल

कोणती ही निवडणूक आल्यावर हे अस षड्यंत्र करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत असतो, असे म्हणत या नेत्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Shivsena
Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

विरार : शिवसेना (Shivsena) पक्षाच्या तिकीटावर बोईसर विधानसभेमधून (Boisar Assembly constituency) उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेले आणि असलेले आणि शिवसेना आमदार रविंद्र फाटक (MLA Ravindra Phatak) यांच्या मर्जीतले असलेल्या डॉ. विश्वास वळवी (Dr. Vishwas Walavi)यांच्यावर जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने पालघरमध्ये खळबळ उडाली आहे.

ठाणे कोलशेत येथील एका जमीन खरेदी प्रकरणात आदीवासी कुटुंबाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता आणि समाजसेवक विश्वास वळवी यांच्यावर ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणे कोलशेत येथील दत्तू नथू बारे यांच्या नावे सर्वे क्र.२८२/१ मध्ये एकूण १६७९० चौमी कब्जे वहीवाटीची जमीन होती.ही जमीन दत्तू बारे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ४ वारसांकडून विश्वास वळवी याने १४,९४,३१,००० रुपयांना खरेदी केली होती.या व्यवहारामध्ये विश्वास वळवी याने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जमीन खरेदी विक्रीची परवानगी मिळवण्यासाठी ४ वारसदारांना प्रत्येकी ३,७३,५७,८८५ रुपयांचे धनादेश देऊन पुन्हा ते धनादेश तुम्हाला नंतर देतो असे सांगून परत स्वत:कडे ठेवून घेतले होते.

Shivsena
राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

त्यानंतर विश्वास वळवी यांनी ४ वारसदारांपैकी १ वारसदार असलेल्या बाजीबाई तुकाराम कोम यांना वारंवार मालाड येथील पंजाब नॅशनल बँकेत नेऊन त्यांच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेत तुझे बँक खाते उघडून तुझ्या खात्यात कोलशेत येथील जमिनीचे तुझ्या हिश्श्याचे पैसे जमा करतो, असे सांगून चेकबुक, कोरे कागद तसेच काही फॉर्मवर अंगठे घेतले व बाजीबाई कोमच्या खात्यावर जमा असलेली करोडोंची रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे वळती करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार बाजीबाई कोम यांचा मुलगा साजन कोम याने कापुरबावडी पोलिस स्टेशनमध्ये केली होती.

या तक्रारीनंतर जमीन खरेदी विक्री प्रकरणात आदीवासी कुटुंबाची करोडो रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत हे प्रकरण ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात मोठी बँनरबाजी करत आसलेल्या विश्वास वळवी याच्यावर एका आदीवासी कुटुंबाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्वत डॉ. विश्वास वळवी यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. 'कोणती ही निवडणूक आल्यावर हे अस षड्यंत्र करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत असतो. मागेसुद्धा असा प्रयत्न सुरू होता. अशी कोणती केस दाखल झाली नाही. मी या वर रीतसर उत्तर देणार आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com