Ulhasnagar Crime : माजी आमदाराचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेल्या दाम्पत्याने संपवलं जीवन

Mumbai News : पती-पत्नीने बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे
Ulhasnagar Crime :
Ulhasnagar Crime :Sarkarnama

Ulhasnagar Crime News: माजी आमदार पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीय सहायक नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील उल्हासनगरमधील आशेळेपाडा परिसरातील ननावरे दाम्पत्याने आपल्या राहत्या घरातील गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या ते कलानी कुटुंबाचे मंत्रालयातील कामे पाहत होते. ननावरे यांनी अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ulhasnagar Crime :
Dada Bhuse on Traffic : आठ दिवसांत वाहतूक कोंडी दूर होईल!

नंदकुमार ननावरे हे आपल्या कुटुंबियासह उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहत होते. त्यांनी मंगळवारी दुपारी आपली पत्नी उर्मिला ननावरे यांच्यासह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत. पण या घटनेने संपूर्ण आशेळेपाडा परिसरात शोककळा पसरली आहे. ननावरे दांपत्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.

ननावरे यांनी माजी आमदार पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केले असून आजच्या स्थितीत कलानी कुटुंबाचे मंत्रालयातील कामे पाहतं होते, अशी चर्चा आहे. तसेच मंत्रालयातील कामानिमित्त शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्याकडे जाणे येणे होते, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com