Shivadi nhava sheva sea link : नवीन वर्षात मुंबईकरांना सरकारकडून भेट

A gift from the government to Mumbaikars in the new year : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला शिवडी - न्हावा शेवा हा प्रकल्पाची सुरवात
Sewri Nhava Sheva Sea Link
Sewri Nhava Sheva Sea LinkSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील दोन महत्वाकांकशी प्रकल्प नागरिकांसाठी नवीन वर्षात सुरु होणार आहेत. शिवडी - न्हावा शेवा हा प्रकल्प येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु होणार आहे. तर मुंबईकरांचा बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचा पहिला टप्पा देखील लवकरच सुरु होणार आहे.

मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून सुटका देणारा कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एमटीएचएल पाठोपाठ कोस्टलरोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sewri Nhava Sheva Sea Link
Sharad Mohol Murder: गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी दोन वकिलांना अटक, पोलिसांची माहिती...

भारतात प्रथमच सकार्डो ही अत्याधुनिक वायूविजन प्रणाली बोगद्यात बसविण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यात धुर न साठता तो बाहेर फेकण्याचे काम या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगद्यांची व्यवस्था असून उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये यूटिलिटी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बोगद्याची पाहणी करत त्यातून गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास केला.

कोस्टल रोडचा दुसरा टप्पा मे महिन्यात

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्प्यातील बोगदा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. या बोगद्याचा आकार देशातील सर्वात मोठा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. कोस्टल रोडवर टोल नाही असे सांगत मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणारा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोस्टल रोडचा पहिला टप्पा

मरीन ड्राईव्ह ते वरळी सी -फेस या कोस्टल रोड बोगद्याचं काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळं लवकरच त्याचं उद्घाटन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दुसऱ्या बोगद्याचं काम मे 2024 पर्यंत पूर्ण होईल. दोन्ही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडीही दूर होणार आहे, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे.

(Edited by Sudesh Mitkar)

Sewri Nhava Sheva Sea Link
Sharad Mohal News : दहा वर्षांपूर्वीचे भांडण, मोहोळ टोळीत माणूस पेरून कसं झालं प्लॅनिंग... वाचा सविस्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com