Sharad Mohal News : दहा वर्षांपूर्वीचे भांडण, मोहोळ टोळीत माणूस पेरून कसं झालं प्लॅनिंग... वाचा सविस्तर

Mohol murder case: पोलिसांनी पाठलाग करून आठ आरोपींना केली अटक...
Sharad Mohal
Sharad MohalSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यात भरदिवसा हत्या करण्यात आली. हत्येमागचं कारण आणि दहा वर्षांपूर्वीच्या रागातून रचण्यात आलेला कट याबाबतची सविस्तर माहिती समोर आली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभावी, अशी ही कथा आहे.

पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा भागात शुक्रवारी दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्याने कोथरुडसह संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर गुंड मोहोळला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीने पथके तयार करून संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि अवघ्या काही तासांमध्ये मुख्य आरोपीसह आठ जणांना ताब्यातही घेतलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Mohal
Sharad Mohol Murder: गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी दोन वकिलांना अटक, पोलिसांची माहिती...

आतापर्यंत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या खुनाचा कट महिन्याभरापूर्वीपासून शिजत होता. यामध्ये प्रामुख्याने शरद मोहोळ याच्याजवळचे साथीदार कटकारस्थान रचत होते. आपल्या पाठीमागे शिजत असलेल्या कटाचा कोणताही सुगावा शरद मोहोळ याला नव्हता. कारण दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा बदला घेण्यासाठी हा कट करण्यात येत होता. प्रकरणातील मुन्ना ऊर्फ साहिल पोळेकर वीस वर्षांचा तरुण यामध्ये प्रमुख मारेकरी आहे.

शरद मोहोळ आणि आरोपी हे एकाच परिसरात राहणारे आहेत. दहा वर्षांपूर्वी मोहोळ आणि आरोपींमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी शरद मोहोळ याने आरोपींना मारहाण केली होती. वारंवार चार-चौघांमध्ये अपमान करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार आरोपींच्याबाबतीत मोहोळ याच्याकडून घडले होते. मात्र त्यावेळी आरोपी लहान होता. त्यामुळे या काळातील घटनेचा बदला आता आरोपींकडून घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. एक महिन्यापूर्वीच आरोपींनी शरद मोहोळच्या खुनाचा कट रचला, यासाठी त्यांनी तीन पिस्तूलदेखील खरेदी केली.

आरोपींनी शरद मोहोळच्या दिनक्रमाची रेकी केली. तो कुठे जातो, कोणाला भेटतो याची इत्थंभूत माहिती आरोपींना होती. तसेच आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळ याच्या गँगमध्ये घुसवले होते. आरोपी मुन्ना सतत मोहोळ यांच्यासोबतच असायचा. तो मोहोळच्या दिनक्रमाची सर्व माहिती आरोपींना द्यायचा. आरोपींनी घटनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा निश्चय केला. शुक्रवारचा दिवस उजाडला. त्यादिवशीदेखील मुन्ना पोळेकर शरद मोहोळसोबतच होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोहोळ कोथरुड परिसरातील सुतारदरा येथील घरातून बाहेर पडला. मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होता. ही संधी आरोपींनी हेरली. काही साथीदार घराच्याजवळच दबा धरून बसले. मुन्ना पोळेकर याने माहिती दिली.

घरातून बाहेर पडताच सर्वात आधी मुन्ना पोळेकर यानेच शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. संधी साधत इतर साथीदारांनी मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात शरद मोहोळ खाली कोसळला. मोहोळसोबत असणाऱ्या इतरांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याजवळ बंदूक असल्याने ते घाबरून पळून गेले. त्यानंतर आरोपींनी चारचाकी गाडीत बसून पळ काढला. घटना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि स्थानिक लोकांशी चर्चा करून, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली.

Sharad Mohal
Sunil Kamble Slap Police : पोलिसाला मारहाण करणे भाजप आमदारांना भोवले; सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल!

आरोपींचा गाडीचा क्रमांक आणि घरचा पत्ता मिळविण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून त्या गाडीचा शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवर शोध घेण्यात आला. दरम्यान, ही गाडी शिवापूर टोलनाक्यावरून पुढे गेल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर शिरवळ परिसरात ही गाडी पोलिसांना आढळून आली. यासाठी सातारा पोलिसांचीही मदत घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या गाडीला गराडा घालून आठ आरोपींना अटक केली. या सर्वांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वकिलाचाही सहभाग...

दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणात दोन वकिलांचाही सहभाग असल्याचे आता समोर आले आहे. हा वकीलच आरोपींना मार्गदर्शन करीत होता, अशीही माहिती समोर आली आहे. या वकिलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यालाही अटक करण्याची करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

(Edited By - Chaitanya Machale)

R...

Sharad Mohal
SambhajiRaje : '2009 ला दिलेल्या जखमा विसरलेलो नाही!'; संभाजीराजेंचा निशाणा कुणावर ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com