Police Transfer Order: निवडणूक आयोगाने ठणकावल्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 111 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

State Government News : केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनंतर आता गृहविभागाकडून मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
 Police Transfer News
Police Transfer News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वपाहणी आणि तयारीच्या उद्देशाने तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा केला होता.या दौऱ्यावेळी निवडणूक आयोगाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला अत्यंत महत्त्वाचे निर्देश दिले होते.

यावेळी आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यातील तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणारे अधिकारी, तसेच गृहजिल्ह्यात नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या येत्या दोन दिवसांत बदल्या करून त्या संदर्भातील प्रमाणपत्र सादर करा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी राज्य सरकारला (State Government) दिले. या सूचनेनंतर राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून तब्बल 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनंतर आता गृहविभागाकडून मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे या पोलिस (Police Transfer) अधिकार्यांच्या मुंबईबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम मलिक्कार्जुन प्रसन्ना यांनी याबदल्यां संबंधीचे आदेश शुक्रवारी (ता.4) जारी केले आहेत.

 Police Transfer News
NCP News : ...अखेर जुन्नरमध्ये बेनकेंच्या विरोधात शरद पवारांनी आपला हुकमी पत्ता काढलाच

काँग्रेसकडून राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. याबाबत वैयक्तिक तक्रारीबाबत आम्ही पत्रकार परिषदेत चर्चा करत नाही.नियमानुसार या तक्रारीवर काम करून योग्यवेळी निर्णय घेतला जाईल,असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले होते.

मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पोलीस निरीक्षक अशा एकूण 111 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक अधिकाऱ्यांची ठाणे जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.प्रवीण दत्ताराम राणे,हर्षवर्धन यशवंतराव गुंड, हेमंत सहदेव गुरव, सुनील दत्ताराम जाधव,संजय सदाशिव मराठे,रवींद्र परमेश्‍वर अडाणे,बळवंत व्यकंट देशमुख,निलेश सिताराम बागुल,सुनील दत्ताराम जाधव,रुता शंशाक नेमलेकर,हेमंत सहदेव गुरव यांसह अनेक समावेश आहे.

 Police Transfer News
Ramdas Athawale : मनोज जरांगेंची मागणी योग्यच, लवकर तोडगा काढा; आठवलेंचा महायुती सरकारला सल्ला

तसेच मुंबई लोहमार्ग पोलीस दलात राजीव शिवाजीराव चव्हाण,संतोष जगन्नाथ माने,राजेश रामचंद्र शिंदे,अनधा अशोक सातवसे,नसिंग चव्हाण,तानाजी सहदेव खाडे,संजय था यांची बदली करण्यात आली आहे. प्रमोद तावडे यांना मिरा – भाईंदर – वसई – विरार आणि विक्रम साहेबराव बनसोडे,राजेंद्र श्रीमनधर काणे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्याचा आदेश काढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com