Ramdas Athawale : मनोज जरांगेंची मागणी योग्यच, लवकर तोडगा काढा; आठवलेंचा महायुती सरकारला सल्ला

Maratha Reservation : सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करतो. मराठा आरक्षणाची भूमिका पहिली आमची होती. मराठा नेते आता जागे झाले आहेत. मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत.
Manoj Jarange Patil-Ramdas Athawale
Manoj Jarange Patil-Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Beed, 05 October : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीवर महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणाची मागणी योग्यच आहे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मनोज जरांगे यांनी मराठा समाज खडबडून जागा केला आहे. त्यांच्या मागणीवर सरकारने वेळीच तोडगा काढावा. परंतु, ओबीसी समाजावरही अन्याय होऊ नये, याची काळजी घेत मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे हे सरकारने ठरवावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

केंद्रात तिसऱ्यांदा मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा शनिवारी (ता. 05 ऑक्टोबर) बीड जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या भूमिकेवरही टिका केली. सरकारमध्ये असताना शरद पवारांनी हे का केले नाही, असा सवाल आठवले यांनी केला.

आठवले म्हणाले, सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करतो. मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) भूमिका पहिली आमची होती. मराठा नेते आता जागे झाले आहेत. मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत. बीडमध्ये आल्यानंतर दिवंगत विनायकराव मेटे, गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

Manoj Jarange Patil-Ramdas Athawale
Vitthal Parivar : महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी विठ्ठल परिवाराचे दबावतंत्र; बैठकांतून ठरणार भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला मंत्रिपद दिले त्या माध्यमातून आपल्याला गायरानधारक, उसतोड कामगार, बेरोजगार युवकांच्या प्रश्नासाठी प्रयत्न करायचे आहेत, असेही आठवले यांनी या वेळी सांगितले.

या वेळी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, बाबुराव कदम, गौतम सोनवणे, मिलिंद शेळके, ब्रम्हनाथ चव्हाण, सिद्धार्थ कासारे, सचिन मोहिते, भास्कर रोडे, राजू जोगदंड आदींची उपस्थिती होती.

Manoj Jarange Patil-Ramdas Athawale
Shikhar Pahariya : सुशीलकुमार शिंदेंच्या सेलिब्रिटी नातवाचा सोलापूर दौरा पुन्हा चर्चेत...

आमच्या ताकदीप्रमाणे सत्तेत वाटा द्या

आम्हाला जास्त नको; पण आमच्या ताकदीप्रमाणे राज्यातील सत्तेत वाटा द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी केज मतदार संघ रिपाइंला सुटला होता. मात्र, ऐनवेळी भाजपने उमेदवार बदलला. आता जागा भेटली तर पप्पू कागदे उमेदवार असतील, असेही आठवले यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com