Mahayuti Government : मंत्रालयातील दालनासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ; पालकमंत्रीपदावरून रुसवेफुगवे वाढले

Mahayuti Government Guardian Minister : मुंबई मंत्रालयातील दालन मिळवण्यासाठी महायुती सरकारमधील मंत्र्यांमध्ये चढाओढ रंगली असून, यातून रुसवेफुगवे देखील वाढले आहेत.
Eknath Shinde | Ajit Pawar | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Ajit Pawar | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे महिन्याभरानंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. आता महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे.

यातच मुंबई मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीत चांगले दालन खेचून घेण्यासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ रंगली आहे. महायुती सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दालनांवरून रुसवेफुगवे देखील वाढले आहेत.

महायुती (Mahayuti) सरकारमध्ये 42 मंत्री आहेत. त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहे. या तिघांना मुंबई मंत्रालयातील इमारतीत सहाव्या मजल्यावर जागा करून द्यावी लागणार आहे. अन्य 39 मंत्री आणि राज्यमंत्र्यांसाठी दालने उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

Eknath Shinde | Ajit Pawar | Devendra Fadnavis
Assembly OBC MLA : विधानसभेत 'ओबीसी' आमदार वाढले; ते कसे? जाणून घ्या एका क्लिकवर...

राज्यात यापूर्वी देखील जम्बो मंत्रिमंडळाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालने उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी 33 कॅबिनेट मंत्र्यांना चांगल्या दालनाची अपेक्षा आहे. यातून वाद होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हस्तक्षेप करावा लागू शकतो.

Eknath Shinde | Ajit Pawar | Devendra Fadnavis
Top 10 News : छगन भुजबळांच्या निशाण्यावर अजित पवार, प्रणित शिंदे अमित शाहांच्या विरोधात आक्रमक-वाचा महत्त्वाच्या घडामोडी

हेवेदावे कसे वाढले

मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीत प्रत्येक विभागाची कार्यालये असलेल्या मजल्यावरच मंत्र्यांची दालने असायची. पुढे मंत्र्यांची ज्येष्ठतेवरून हेवेदावे सुरू झाले आणि ही प्रथा मोडली. दालन सहाव्या मजल्यावर असण्यासाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली.

बाहेरच्या जिल्ह्यात कोणाला संधी?

महायुती सरकारमधील मंत्र्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. तिन्ही पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते एकेका जिल्ह्यातून मंत्री झाल्यामुळे त्यांनी पालकमंत्रीपदावर दावे ठोकायला सुरवात केली आहे. प्रत्येक मंत्र्‍याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे खातेवाटप होताच पालकमंत्रीपदासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ रंगली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मंत्रीपदे मिळाली नाहीत. त्यामुळे एकापेक्षा जास्त मंत्रीपद मिळालेल्या जिल्ह्यांतील मंत्र्यांना बाहेरच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद भूषवावे लागणार आहे. महायुती सरकारमध्ये 35 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे राज्यमंत्र्यांना पालकमंत्रीपदावर संधी मिळणे अवघडच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com