
Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या सत्ताकारणासाठी सुरू असलेल्या जातीय, प्रांत वादावर जोरदार टीकास्त्र सोडले.
'भाजपमुळेच महाराष्ट्रविरुद्ध गुजरात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून भाजपला मराठमोळं हिंदुत्व मोडून काढायचं आहे', असा गंभीर आरोप ठाकरेंनी केला.
आमदार आदित्य ठाकरे यांनी सकाळ माध्यम समूहाच्या मुंबईतील साम मराठी कार्यालयात 'काॅफी वुईथ सकाळ' सदराखाली संवाद साधला. देशासह राज्यात, विशेष करून महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपकडून (BJP) सुरू असलेल्या जातीयवाद, प्रांतवादाच्या राजकारणावर टीकास्त्र सोडले.
आदित्य ठाकरे म्हणाले, "मराठी-गुजराती वादच नाही. भाजपमुळे महाराष्ट्र-गुजरात, असा वाद सुरू झाला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) सर्व लोक स्वप्न घेऊन येतात. ती स्वप्न चिरडून तुम्ही काय प्राप्त करणार? राज्यातील उद्योग परराज्यात जातात. नोकऱ्या किती उपलब्ध होतील, हे सत्तेत असलेल्यांनी पाहिले पाहिजे".
'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, तो हवाच होता. पण मराठी राजभाषा भवनाचे कामांवर अमराठी माणूस आक्षेप घेत आहे. तेथील स्थानिक आमदार देखील वेगळीच भूमिकेत आहे. सरकारी कामांवर पूर्ण अमराठींची दादागिरी आहे. मुंबई-नागपूर अशा मेट्रोची गरज असताना, मुंबई-अहमदाबाद अशी मेट्रोचा प्रस्ताव आहे. त्यावर काम सुरू आहे. हे का होत आहे? आता भाजप सरकार आहे, हिंदी बोला, असे सांगितले जात आहे. भाजपमुळेच महाराष्ट्रविरुद्ध गुजरात असा वाद सुरू झाला आहे', असे गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
भाजपला महाराष्ट्रातील मराठमोळं हिंदुत्व मोडून काढायचे आहे. गपणती बाप्पाची मिरवणूक यांनीच आडवली. ज्याने गोळीबार केल्या, त्यालाच सिद्धिविनायक मंदिराचा ट्रस्टी बनवला आहे, असा घणाघात देखील आदित्य ठाकरे यांनी केला.
राज्यात मध्यंतरी कॉन्ट्रैक्टर मुख्यमंत्री होते. पण आता बहुमत असलेले मुख्यमंत्री राज्याच्या कारभार संभाळत आहेत. आम्ही विधी भवनाचं प्रतिनिधीत्व करतो. तिथं इगो बाजूला ठेवूनच राज्याच्या हितासाठी काम केले पाहिजे. पण आता तसं होताना दिसत नाही. होर्डिंगची स्पर्धा पहिल्यावर, ते लक्षात येते. रावणाला दहा तोंड होती. आता आमच्या राजकीय नेत्यांना पाच-पाच तोंड होर्डिंगवर दिसतात. हा किळसवाणा प्रकार आहे. विद्रुपीकरण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर भूमिका घेतली पाहिजे. एवढं बहुमत आहे की, ते मंत्र्यांना ते सांगतील, ते पीए नेमले जातील. पण राजकीय परिपक्वता कोठेच दिसत नाही, याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.