Assembly Session : आदित्य ठाकरे-गुलाबराव भिडले; ‘मंत्र्यांचा अभ्यास पक्का असावा नाही तर टिंगल होते; ठाकरे फार अभ्यास करून आलेत’

एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आलं नाही, तर मग टाईमपास होतो.
Aaditya Thackeray - Gulabrao Patil
Aaditya Thackeray - Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politic's : सोलापूर विमानतळाच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची आज (ता. २१) विधानसभेत विरोधकांकडून कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीविषयी आपल्याला काही माहिती नाही, अशी कबुली त्यांनी उत्तरात दिली. मात्र, आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून ‘सकाळी तुम्ही आम्हाला लक्षवेधी देता, त्यावर मंत्र्यांचा अभ्यास पक्का असावा. नाही तर अशी टिंगल होते,’ असा टोमणा लगावला. त्यावर ‘आदित्य ठाकरे फार अभ्यास करून आले आहेत, मला माहिती आहे. आईच्या पोटी कोणी हुशार होऊन जन्माला येत नाही,’ असे प्रत्युत्तर दिले. (Aaditya Thackeray - Gulabrao Patil came face to face in the Assembly)

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याकडील काही खाती अधिवेशन काळापुरती ही इतर मंत्र्यांकडे दिली आहेत. त्यात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याकडे विमान सेवेविषयी खात्याचा पदभार देण्यात आलेला आहे. विमानतळासंदर्भातील सोलापूरकरांच्या (Solapur) भावना लक्षात घेऊन तातडीची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे पाटील यांनी उत्तर दिले. मात्र, सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीविषयीच्या प्रश्नावर उत्तर देता आले नाही. त्यावेळी भाजपचे सुभाष देशमुख त्यांच्या मदतीला आले. त्यावरून ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना टोमणा लगावला.

Aaditya Thackeray - Gulabrao Patil
Girish Chaudhary Granted Bail: खडसे कुटुंबीयांना मोठा दिलासा; जावई गिरीश चौधरींना दीड वर्षानंतर जामीन मंजूर

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की, सभागृह सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडील खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली जातात. त्यातून त्यांच्यावरील भार कमी करण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक दिवशी खाती बदलू नयेत. कारण नाही तर अशी टिंगल होते. (गुलाबराव पाटील यांच्याकडे पाहत मी आपल्यावर आक्षेप (ऑब्जेक्शन) घेत नाही) पण, एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आलं नाही, तर मग टाईमपास होतो. आम्ही सर्व आमदार आमच्या मतदारसंघाला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज सरकारपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करतो. मंत्र्यांकडून अपेक्षित उत्तर आलं नाही, तर सगळ्यांनाच त्रास होतो.

Aaditya Thackeray - Gulabrao Patil
Leader Of Opposition News : संग्राम थोपटेंचा विरोधी पक्षनेतेपदासाठी शड्डू; काँग्रेस हायकमांडला पाठविले ३० आमदारांच्या सह्यांचे पत्र

त्यावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत ‘आपण काल-परवा सभागृहात नव्हता. मी यासंबंधी रुलिंग वाचून दाखवलं आहे. खातेवाटप (अधिवेशनापुरती जबाबदारी) जसं झालं आहे, ज्या प्रभारी मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे, त्याची संपूर्ण माहिती मी सभागृहासमोर मांडली आहे, असे स्पष्ट केले.

‘मी रायगडमध्ये होतो. पण, एवढंच आहे की आता जशी परिस्थिती झाली आहे. एक सन्मानीय सदस्य (सुभाष देशमुख पाटील यांच्या मदतीसाठी आले होते) मंत्र्यांसाठी उत्तर देत आहेत. सकाळी तुम्ही आम्हाला ज्या लक्षवेधी देता, त्यावर मंत्र्यांचा अभ्यास पक्का असावा,’ असा टोमणा आदित्य ठाकरे यांनी पाटील यांना लगावला.

Aaditya Thackeray - Gulabrao Patil
Manipur Incident In Assembly : मणिपूर मुद्यावर काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक; बोलण्याची परवानगी नाकारल्याने विरोधकांचा सभात्याग

त्याला प्रत्युत्तर देताना गुलाबराव म्हणाले की, आदित्य ठाकरे फार अभ्यास करून आले आहेत, मला माहिती आहे. मूळ प्रश्नाला उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. हे सर्व बाहेरचे प्रश्न आहेत. ते ऐनवेळी आलेले आहेत. (आदित्य ठाकरे मध्येच बोलत होते) त्यामुळे आता ऐका हो. आईच्या पोटी कोणी हुशार होऊन जन्माला येत नाही. आलं का लक्षात? तुम्हाला विमानतळाचे प्रश्न माहिती असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com