Girish Chaudhary Granted Bail: खडसे कुटुंबीयांना मोठा दिलासा; जावई गिरीश चौधरींना दीड वर्षानंतर जामीन मंजूर

Eknath Khadse's Son-in-law Granted Bail: एकनाथ खडसे यांच्या जेष्ठ कन्या शारदा चौधरी यांचे गिरीश चौधरी हे पती आहेत.
Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
Published on
Updated on

Supreme Court News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून ते ईडीच्या ताब्यात होते. चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यामुळे खडसे आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Eknath Khadse's son-in-law Girish Chaudhary granted bail)

भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड खरेदीत तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सुमारे ३१ कोटी रुपयांचा हा भूखंड खडसे यांचे जावई गिरीश चौधरी आणि त्यांच्या पत्नी यांनी अवघ्या ३.७ कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी चौधरी यांना दीड वर्षापूर्वी ईडीने अटक केली हेाती.

Eknath Khadse
Manipur Incident In Assembly : मणिपूर मुद्यावर काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक; बोलण्याची परवानगी नाकारल्याने विरोधकांचा सभात्याग

भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप ठेवून ईडीने खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै २०२१ मध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहात होते. सर्वोच्च न्यायालयात आज त्यांच्या जामीनावर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांना जामीन मंजूर केला, त्यामुळे तब्बल दीड ते दोन वर्षांनंतर त्यांची सुटका होणार आहे. खडसे यांना राजीनामा द्यावं लागणं आणि त्यानंतर जावई चौधरी यांना अटक होणे, हे एकनाथ खडसे यांच्यासाठी धक्कादायक होते.

Eknath Khadse
Leader Of Opposition News : संग्राम थोपटेंचा विरोधी पक्षनेतेपदासाठी शड्डू; काँग्रेस हायकमांडला पाठविले ३० आमदारांच्या सह्यांचे पत्र

दरम्यान, या प्रकरणात खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचीही चौकशी झाली होती. त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार होती. मात्र, त्यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता. आता खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर झाल्यामुळे खडसे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. चौधरी यांनी यापूर्वी अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता. अखेर दीड वर्षांनंतर खडसेंच्या जावयाला जामीन मिळाला आहे.

एकनाथ खडसे यांच्या ज्येष्ठ कन्या शारदा चौधरी यांचे गिरीश चौधरी हे पती आहेत. ते पुणे येथे वास्तव्यास आहेत; परंतु काही वर्षे ते विदेशात होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणानंतर ते चर्चेत आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com