Aaditya Thackeray on White Paper : उद्योगांवरून आदित्य ठाकरेंचा पलटवार ; व्हाईट पेपर आहे की काळा पेपर समजत नाही..

महिला खासदारांना मंत्री शिव्या देतात, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार, असे ठाकरे म्हणाले
Aaditya Thackeray, Mangesh Kudalkar
Aaditya Thackeray, Mangesh Kudalkar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिका काढल्यानंतर त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका

केली आहे. "सामंतांनी मांडलेली श्वेतपत्रिका ही व्हाईट पेपर आहे की काळा पेपर हे कुणालाही समजत नाही. सरकार बदलले आणि गद्दार सरकार आले आहे. हे गद्दार सरकार आम्ही उद्योग आणले हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे अकार्यक्षम गद्दार सरकार आहे," असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

"ज्या राज्यात महिला खासदारांना मंत्री शिव्या देतात त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार," असे आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता टीका केली. काल उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी मोठे उद्योग प्रकल्प राज्याबाहेर का गेले याबाबतची श्वेतपत्रिका विधान परिषदेत काढली.

शिंदे-फडणवीस यांच्या कार्यकाळात उद्योग राज्याबाहेर गेले, यावरून ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले होते. या श्वेतपत्रिकेवरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले.

"महाराष्ट्राची मागील अडीच वर्षे जी वाया गेली, त्या काळातील कवित्व महाराष्ट्र आजही विसरणार नाही. कोविडबाबत वैज्ञानिक नाही, तर तत्कालीन मुख्यमंत्री तज्ज्ञ होते," असा टोला शेलारांनी लगावला.

"श्वेतपत्रिकेवरुन जे उघड झाले, तेच आम्ही सांगत होतो. वेदांता आणि फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता. त्यांच्यासोबत कुठलाही करार झाला नव्हता. तरीही 'ते'(आदित्य ठाकरे) ‘प्रकल्प गेला..प्रकल्प गेला’ असे गळे काढत होते. या प्रकारचे वर्णन 'लबाड लांडगा ढोंग करतोय' असेच करावे लागेल," असा टोला शेलारांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com