Aaditya Thackeray News : " त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच.."; सरवणकरांच्या निवडीवरुन आदित्य ठाकरेंची 'फायरिंग'

MLA Sada Sarvankar Political News : गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान हवेत गोळीबार प्रकरणामध्ये सरवणकर अडचणीत आले होते.
Aaditya Thackeray- Sada Sarvankar News
Aaditya Thackeray- Sada Sarvankar NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली होती. त्यांनंतर शिंदेंनी भाजपसोबत सत्ताही स्थापन केली.यानंतर शिंदे आण ठाकरे गटातला संघर्ष उभ्या महाराष्ट्राने गेली दीड वर्ष अनुभवला आहे. मात्र, शिंदेंनी त्यांच्यासोबत आलेल्या शिलेदारांना नाराजीची संधी दिली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता आमदार सदा सरवणकरांनाही मोठं दिवाळी गिफ्ट देतानाच आमदार सदा सरवणकरांची मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांना अध्यपदावरुन हटवण्यात आले आहे. याचवरुन आता माजी मंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरेंनी सरवणकरांच्या निवडीवरुन शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Aaditya Thackeray- Sada Sarvankar News
Maratha Reservation : 'मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरंच सांगतात अन्‌ मंत्री आता वेगळंच बोलताहेत...'

शिंदे गटाचे नेते आणि आमदार सदा सरवणकर(Sada Sarvankar) यांची सिध्दीविनायक मंदिराच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीवरुन पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटात वाद पेटण्याची शक्यता आहे.आमदार आदित्य ठाकरेंनी ट्विट करत सरवणकरांच्या निवडीवरुन महायुती सरकारसह शिंदे गटावरही हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच,मिंधे-भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले असल्याचा खोचक टोला ठाकरेंनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे ट्विटमध्ये काय म्हणाले...?

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विटमधून शिंदे- फडणवीस- पवार सरकारवर निशाणा साधला.ते म्हणाले, दादरमध्ये यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला,आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली,टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं.नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती.त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे-भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले असेही ठाकरे म्हणाले.

सदा सरवणकर कोण आहेत...?

मुंबई हा शिवसेनेचा कायमच बालेकिल्ला राहिला आहे.त्यात सदा सरवणकर हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जात होते.कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जाते.आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. त्यांनी माहीम,दादरचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचं काम केलं आहे.

शिवसेनेत असताना सरवणकरांनी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. सरवणकर हे 2004 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये सरवणकर पुन्हा आमदार झाले.आता त्यांच्याकडे सिध्दीविनायक मंदिराचे अध्यक्षपद दिले आहेत.

Aaditya Thackeray- Sada Sarvankar News
Maratha Reservation : ओबीसी समाजानं म्हटलं, भुजबळ जे बोलताहेत ती आधीपासूनची भूमिका

गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान हवेत गोळीबार प्रकरणामध्ये सरवणकर अडचणीत आले होते.मात्र, नंतर या प्रकरणात क्लीन चिट मिळाली होती. सदा सरवणकरांची मंत्रिपदाची संधी हुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती, पण आता सरवणकरांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Aaditya Thackeray- Sada Sarvankar News
Ahmednagar News : सरकारने शेवगाव-पाथर्डीवर अन्याय केला; भाजपच्या पदाधिकाऱ्यांचाच सरकारला घरचा आहेर !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com