Story of Narhari Zirwal's Dance : शरद पवारांचा फोन...पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स...अन॒ मुंबई दौरा; झिरवळांनी सांगितली ती स्टोरी

रात्री पावणे अकराच्या सुमारास ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आला.
Narhari Zirwal Dance Story
Narhari Zirwal Dance StorySarkarnama
Published on
Updated on

Pargaon (Pune) : विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नरहरी झिरवळ हे पत्नीला खांद्यावर घेऊन नाचत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पत्नीला खांद्यावर घेऊन नाचण्यामागील कारण खुद्द झिरवळ यांनीच सांगितले आहे. (Narhari Zirwal told the reason behind dancing with his wife on his shoulders)

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील पशुवैद्यक डॉ. शांताराम गावडे यांचा मुलगा ऋषिकेश याच्या विवाहासाठी नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे आज (रविवारी, ता ११ जून) मेंगडेवाडी येथे आले होते. वधू-वरांना शुभेच्छा देताना त्यांनी अनेक किस्से सांगितले. त्यातीलच एक किस्सा हा पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स करण्याचा होता.

Narhari Zirwal Dance Story
Narhari Zirwal News : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी प्रथा जपत वूध-वरांना केला रोख आहेर....

झिरवळ म्हणाले की, माझ्या भाचीचे लग्न होते. आदल्या रात्री हळदीचा कार्यक्रम सुरु होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोन आला. ‘महत्वाचे काम आहे, अर्जंट मुंबईला या.’ नेत्यांचा फोन आल्याने मला राहवले नाही; परंतु घरातही लग्न असल्याने सर्व नातेवाईक जमलेले, त्यात मी शक्कल लढवली. बायकोला खांद्यावर घेऊन हळदीच्या कार्यक्रमात नाचलो. मग काय बायको खूष आणि नातेवाईकही खूष. मग मी मुंबईला रवाना झालो.

Narhari Zirwal Dance Story
Solapur Politic's : मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक, राष्ट्रवादी नेत्याच्या घरी विखे पाटलांची भेट; मोहिते पाटील, सातपुते मैदानावरच रेंगाळले

अशा प्रकारे घरात लग्न असूनही राजकारण्यांना कशी तारेवरची कसरत करावी लागते, याचा किस्सा विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी सांगितला. घरातील लोक आणि नातेवाईकांना खूष करून मुंबईत पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कंगव्याची किंमत १२०० रुपये अन्‌...

दुसरा किस्सा त्यांनी जपान दौऱ्याचा सांगितला. ते म्हणाले की मी आणि माझी पत्नी नुकतेच जपानला गेलो होतो. मी सदरा, पायजमा आणि टोपी तर बायको नऊवारी साडीत गेलो होतो. जाताने मुलाने आईला केस विंचरण्यासाठी एक कंगवा घेऊन दिला होता. जपानमध्ये पोचल्यावर हॉटेलमध्ये बायकोच्या हातातून तो कंगवा खाली पडला. तो कचाकड्याचा असल्याने त्याचे दोन तुकडे झाले.

Narhari Zirwal Dance Story
Dilip Mohite Vs Adhalrao : आगामी लोकसभेचे तिकिट आढळरावांनाच भेटू दे रे देवा; राष्ट्रवादीचे आमदार मोहितेंनी अशी प्रार्थना का केली

संध्याकाळी तेथील दुकानामध्ये बायकोला घेऊन कंगवा आणण्यासाठी गेलो, तर एका कंगव्याची किमत सांगितली १२०० रुपये. बायको म्हणाली, एवढ्या महागाचा कंगवा नको, मी त्या तुटलेल्या तुकड्याने केस विंचरते. माझ्या बायकोने कोणतीही तक्रार न करता पुढचे चार दिवस त्याच तुकड्याने केस विंचरले.

Narhari Zirwal Dance Story
Solapur Shivsena Leader warn BJP : ‘त्या’ लोकांना ताकद देणार असाल तर भाजपने आमच्या मदतीची अपेक्षा ठेवू नये; शिंदे गटाच्या नेत्याने सुनावले

मी झिरवळ असलो, तरी आंबेगावची हिरवळ ही वळसेंच्या कामाची पोचपावती

नरहरी झिरवळ निरगुडसर येथे येत असताना गाडीतील सहकाऱ्यांना आंबेगावातील झालेला विकास, हिरवीगार शेती दाखवत म्हणाले की, शरद पवार यांचा परिसस्पर्श झालेले दिलीप वळसे पाटील या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत. मी जरी नावाने झिरवळ असलो, तरी येथील हिरवळ ही वळसे पाटील यांच्या कामाची पोचपावती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com