Abhishek Ghosalkar : 'या' कारणांमुळे अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू; डॉक्टरांनी दिला पोस्टमार्टेम रिपोर्ट

Mumnai Crime : अभिषेक घोसाळकर यांची हत्या नेमकी कशासाठी, याचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान
Abhishek Ghosalkar Case Update
Abhishek Ghosalkar Case Update Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News :

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मुंबई हादरली आहे. आठवडाभरात झालेला हा दुसरा गोळीबा होता. त्यामुळे राज्यात नक्की चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशातच घोसाळकरांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला आहे.

अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर घोसाळकर यांना तातडीने बोरिवलीतील रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव पोस्टमार्टेमसाठी जे जे हॉस्पिटलपमध्ये (JJ Hospital) पाठवण्यात आले. त्यांचा अहवाल आता काल रात्री आला.

Abhishek Ghosalkar Case Update
Uddhav Thackeray : घोसाळकरांच्या हत्येनंतर ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी; 'सरकार बरखास्त करा अन्...'

हे आहे मृत्यूचे कारण

अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने फेसबुक लाइव्ह सुरू असताना गोळ्या झाडल्या. यात घोसाळकर यांना चार गोळ्या लागल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यात रक्तस्राव आणि हॅमरेज शॉकमुळे घोसाळकरांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टेमच्या (Post Mortem) रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मॉरिसच्या गोळीबारात ते जबर जखमी झाले. लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण, काहीही उपयोग झाला नाही. ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. (Abhishek Ghosalkar Firing Case)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे यापुढेही राजकीय पडसाद उमटतील, अशी भीती आता व्यक्त होत आहे. फेसबुक लाइव्ह करत एखाद्या राजकीय नेत्याची हत्या करण्याची कदाचित ही पहिली घटना असावी.

ज्या मॉरिसने (Mauris) अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या तो मॉरिसभाई म्हणून ओळखला जायचा. बलात्काराचा आरोप झाल्यामुळे त्याला तुरुंगवारी करावी लागली होती. यामागे अभिषेक घोसाळकर असल्याचा त्याचा संशय होता. शिवाय बोरिवलीतील आयसी कॉलनी परिसरातून त्यास निवडणूक लढवायची इच्छा असल्याने अभिषेक घोसाळकरांना तो राजकीय शत्रू मानत होता.

त्यामुळेच अगदी थंड डोक्याने अगदी विचारपूर्वक नियोजन करून मॉरिसने अभिषेक घोसाळकरांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Abhishek Ghosalkar Case Update
CM Eknath Shinde : गुंडाची 'सेल्फी विथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे'; राऊतांकडून मुख्यमंत्र्यांवर नवा 'ट्विट' हल्ला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com