Abhishek Ghosalkar Shot Dead Update : यूपीच्या बंदुकीने केला अभिषेक घोसाळकर यांचा घात?

Abhishek Ghosalkar Case Update : मॉरिसने बंदूक आणली कुठून?
Abhishek Ghosalkar Case Update
Abhishek Ghosalkar Case Update Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी आमदार विनोद घोसाळकर ( Vinod Ghosalkar ) यांचे पुत्र आणि शिवसेनेचे ( ठाकरे गट ) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर ( Abhishek Ghosalkar) यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार झाला आहे. मॉरिस नावाच्या व्यक्तीनं हा हल्ला केला. मॉरिसनं स्वत:वरही गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत घोसाळकर आणि मॉरिस या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. Abhishek Ghosalkar Shot Dead Update

Abhishek Ghosalkar Case Update
ED Action On Maharashtra Politician : 'ईडी'च्या कचाट्यात अडकलेल्या 'या' नेत्यांनी धरली भाजप सरकारची वाट; पाहा यादी!

दरम्यान, मॉरिसने ज्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या त्या बंदुकीचे लायसन्स उत्तर प्रदेशातील फुलपूर जिल्हा पोलिसांनी जारी केले आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या संदर्भात आता अंबरिश मिश्रा या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. नेमकं ही बंदूक मॉरिसने स्वतःकडे कधी घेतली? या पूर्व नियोजित कटामध्ये मॉरिसचे किती समर्थक यामध्ये सामील आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत.

Abhishek Ghosalkar Case Update
Ncp News : ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवे बॅनर; चिन्ह तुम्हारा, 'बाप' हमारा

आत्महत्या केलेल्या मॉरिसच्या काही मित्र व समर्थकांना पोलिस चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती. दरम्यान, या घटनेने मुंबईच्या राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे. या घटनेनंतर काही वेळातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत ट्विट करत म्हणाले, "महाराष्ट्रात गुंडा राज, अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा माॅरिस नारोन्हा हा चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. माॅरिस याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले! (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय) आज त्याने अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या!," असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com