Ayodhya Poul News : ठाकरेंची खिंड लढवणाऱ्या अयोध्या पौळला जबर मारहाण; यामिनी जाधवांवर गंभीर आरोप

Loksabha Election 2024 : मारहाण करणाऱ्या बायकांनी आपला मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप देखील अयोध्या पौळ यांनी केला आहे.
uddhav Thackeray Ayodhya Poul  Yamini Jadhav
uddhav Thackeray Ayodhya Poul Yamini Jadhav sarkarnama

Mumbai Political News : अवघ्या चार दिवसांवर पाचव्या टप्प्यातील मतदानाचा दिवस आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. मुंबईतील तीन जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा थेट सामाना होतो आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी फेसबूक लाईव्ह करत त्यांना शिंदे गटाच्या Eknath Shinde Group उमेदवार यामिनी जाधव यांच्या समर्थक महिलांकडून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

uddhav Thackeray Ayodhya Poul  Yamini Jadhav
Eknath Shinde News: 800 कोटींचा आरोप, पालकमंत्र्यांसह संपूर्ण शिंदेसेना मुख्यमंत्र्यांच्या बचावाला धावली

यामिनी जाधव Yamini Jadhav यांच्या बायका माझ्या घरात आल्या. त्यांनी प्रचाराचे काही साहित्य आपल्या घरात टाकले. आणि आपल्याला मारहाण केली, असे अयोध्या पौळ आपल्या फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले आहे. महिला पुरुषांनी घरात घुसून विनयभंग केल्याचे देखील पौळ Ayodhya Poul यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मारहाण करणाऱ्या बायकांनी मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप देखील अयोध्या पौळ यांनी केला आहे.आपल्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव जबाबदार असतील, असे पौळ यांनी सांगितले आहे. मारहाण करणाऱ्या 20 ते 25 बायकांनी मारहाण केल्याचा दावा देखील केला.

व्हिडिओ डिलिट केला

मारहाण करताना आपल्या कामवाल्या बाईने आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ काढला होता. मात्र, तो आपला फोन मारहाण करणाऱ्या बायकांनी हिसकावून नेला. तसेच त्यामधी मारहाणीचा व्हिडिओ देखील डिलिट केला, असे देखील अयोध्या पौळ यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com