Mumbai News: बॉलिवूड अभिनेता आणि निर्माते कमाल राशीद खान (केआरके) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी दुबईला जात असतानाच पोलिसांनी कमाल खान यांना मुंबई विमानतळावरच अटक केली आहे.
त्यानंतर कमाल खान यांनी माझ्या जिवाला धोका असल्याची माहिती आज (सोमवारी) आपल्या एक्स अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर) दिली.यासाठी सलमान खान जबाबदार असल्याचा आरोपही केआरके यांनी केला आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
मी गेल्या एक वर्षापासून मुंबईत आहे. माझ्या विरोधात 2016 मधील एका प्रकरणाचा खटला सुरू आहे. त्याप्रकरणी मी नियमित न्यायालयातही जात आहे. मात्र, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मी दुबई जात असतानाच मुंबई पोलिसांनी मला विमानतळावरच अटक केली आहे. पोलिसांच्या मते माझ्यावर दाखल असलेल्या 2016 च्या केसनुसार मी देश सोडून जाऊ शकत नाही, अशी माहितीही कमाल खान यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
आपल्यामुळे सलमान खानचा टायगर ३ हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यामुळे या प्रकरणात सलमान खानचा हात असल्याचा आरोप केकेआरमध्ये केला आहे. तसेच माझ्या जीवाला धोका असून उद्या जर माझा मृत्यू झाला तर तो खून असेल आणि यासाठी कोण जबाबदार असेल हे सर्वांना माहिती आहेच, असा उल्लेखही ट्विटमध्ये करण्यात आला आहे. याचबरोबर कमाल खान हे ट्विट पोस्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देखील टॅग केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कमाल खान हे नेहमीच आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असतात.त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण सिनेकलाकारांची बदनामी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांना तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. सर्वात प्रथम त्यांना अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
यापूर्वी कमाल खान यांना 2022 मध्ये दोन वेळा अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2016 मध्ये कमाल खान यांच्या विरोधात विक्रम भट्ट यांनी तक्रार दाखल केली होती. तसेच कमाल खान यांना गेल्यावर्षी त्यांच्या फिटनेस ट्रेनरचा लैगिकछळ केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.
कमाल राशिद खान म्हणजेच केआरके यांनी 2008 मध्ये'देशद्रोही' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधी कोणत्या चित्रपटामध्ये नायक म्हणून काम केलेले दिसून आले नाही. केआरके यांनी बिग बॉस या रियालिटी शो मध्येही भाग घेतला होता.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.