Aditya Thackeray : वरळी मतदारसंघावरुन ठाकरेंनी भाजपला डिवचलं; म्हणाले, "कितीही चिखल…"

Aditya Thackeray On BJP About Worli Constituency : "वरळीची जागा कशी आहे बघायला सगळे येतील. वरळी ए प्लस होताना सगळीकडून लोकं येतात. मी त्यांचे स्वागत करतो. मोठ्या लोकांनी इथे रोड शो पण करावा अशी मी विनंती करतो."
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

Mumbai News, 23 June : वरळीत कितीही चिखल झाला असला तरी भाजपला कमळ फुलवू देणार नाही, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागल्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी विधासभेसाठी कंबर कसली आहे. यासाठी आता युतीतील पक्षांकडून विधानसभेची मोर्चेबांधणी सुरु आहे.

अशातच आता वरळी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) धक्का देण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

वरळीत कितीही चिखल झाला असला तरी भाजपला (BJP) कमळ फुलवू देणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपला डिवचलं. माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं, ते म्हणाले, "मी निवडणूक लढवताना म्हणालो होतो की, वरळीची जागा कशी आहे बघायला सगळे येतील. वरळी ए प्लस होताना सगळीकडून लोकं येतात. मी त्यांचे स्वागत करतो. मोठ्या लोकांनी इथे रोड शो पण करावा अशी मी विनंती करतो. वरळीमध्ये कितीही चिखल असला तरी याठिकाणी कमळ येऊ देणार नाही."

Aditya Thackeray
Vishal Patil : "फडणवीस सरकारनं जरांगेंना त्रास दिला अन् मी खासदार झालो", विशाल पाटील असं का म्हणाले?

दरम्यान, यावेळी त्यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहारावर बोलताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला, महाराष्ट्राचे राजकारण दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. मागील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात लूट सुरु आहे. देशातही सारखीच परिस्थिती आहे. नीट, नेट परीक्षा आणि सीईटीचा मुद्दा आम्ही उचलून धरला आहे. परीक्षेवर चर्चा झाली पाहिजे.

Aditya Thackeray
Radhakrishna Vikhe On Manoj Jarange : 'मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही'; भाजप नेते विखेंनी जरांगेंना फटकारलं

मात्र, भाजप फक्त कोण कोणत्या धर्माचा आणि जातीचा यावरच बोलत आहे. पण तरुण पिढी ज्या समस्येला तोंड देत आहे त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. भाजप भूतकाळाविषयी बोलतो तर आम्ही भविष्याबद्दल बोलतो, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com