Aditya Thackeray Replied on Supreme Court : न्यायालयाच्या निर्णयाचा आदित्य ठाकरेंनी तीन शब्दांतच सांगितला अर्थ...!

Maharashtra Politics | सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आपला निर्णय जाहीर केला.
Aditya Thackeray Criticized CM Shinde:
Aditya Thackeray Criticized CM Shinde: Sarkarnama

Aditya Thackeray on Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आपला निर्णय जाहीर केला. या निर्णयात न्यायालयाने प्रतोद निवड आणि राज्यपालांची भूमिका बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण नोंदवलं. पण उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यामुळे आपण स्थिती पूर्ववत आणू शकत नाही. असाही निर्णय न्यायालयाने दिला. यामुळे सध्या तरी शिंदे सरकार (Shinde Government) वाचलं. या निर्णय़ावर आता राजकीय नेतेमंडळीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. (Aditya Thackeray explained the meaning of the court's decision in three words...!)

न्यायालयाच्या निर्णयावर आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस (Shinde Government) सरकारवर हल्लाबोल केला आहे. ''असंवैधानिक, बेकायदेशीर, अनैतिक विशेषत:आजच्या निकालानंतर, मिंधे-भाजप गद्दार सरकारकडे पाहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. पूर्वीच्या राज्यपालांची भूमिका ही सरकार ताब्यात घेणे आणि लोकशाही आणि संविधान दडपून टाकणे अशी आहे. त्यांनी राज्यपाल म्हणून नव्हे तर पक्षाचा माणूस म्हणून काम केले. जर काही नैतिकता आणि लाज उरली असेल तर असंवैधानिक मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांचा सत्तेचा लोभ उघड आहे, पण नैतिकता आणि लोकशाही सर्वोच्च असली पाहिजे.''

Aditya Thackeray Criticized CM Shinde:
Supreme Court Live : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे ९ मुख्य भाग; सरन्यायाधीश चंद्रचूड काय म्हणाले...

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहे. उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना पक्षनेते पदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. पक्षातील फुटीबाबत विधानसभा अध्यक्षांना ३ जुलै रोजी माहिती होती. पक्षातील फुट दोन प्रतोद आणि नेत्यांच्या नियुक्ती हे मुद्दे अध्यक्षांना माहिती होते. पण अध्यक्षांनी त्याबाबत चौकशी करायला हवी होती. पण तरीही या प्रकरणात अध्यक्षांनी गोगावलेंची मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली जी बेकायदेशीर होती, असं निरीक्षण सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI Chandrachud) यांनी नोंदवलं.

तर निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, "न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही पूर्णपणे समाधान व्यक्त करतो. लोकशाहीचा पूर्णपणे विजय झाला आहे. असं मी नमूद करतो. या निकालातील पाच ते सहा मुद्यांकडे लक्ष वेदतो. न्यायालयाच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर पूर्णपणे पाणी फेरलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही", असं फडणवीस म्हणाले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com