आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल केली अन् 'वन्समोअर'ची मागणी झाली!

Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या जनप्रक्षोभ मोर्चात आदित्य ठाकरेंनी केली शिंदेंची नक्कल
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray News : ठाण्यातलं राजकारण गेल्या दोन दिवसांपासून चांगलच तापलं आहे. ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे या महिलेला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीने जनप्रक्षोभ मोर्चा काढला आहे. या जनप्रक्षोभ यात्रेत बोलतांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केली.

Aaditya Thackeray
Aditya Thackeray Challenge : ठाण्यात येऊन जिंकून दाखवणार : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान..

जनप्रक्षोभ यात्रेला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे म्हणाले, "गद्दारी केलेलं जे मिंदेंचे सरकार महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे. या सरकारला सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले हे सरगळ्यांना माहिती आहे.

यावेळी बोलतना आदित्य यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी नक्कल केली. ते म्हणाले, ''शर्ट खालती-वरती करीत, वर-खाली बघून अन् दाढी खाजवत अभद्र भाषा बोलतात.'' या वेळी आदित्य ठाकरे यांच्या हावभावावरून उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. यावेळी अनेकांनी वन्स मोअरचे नारे दिले. यावर आदित्य म्हणाले, वन्स मोअर नाही, असे लोक 'ओनली वन्स' असतात.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ''आपल्या मोर्चासाठी पोलिसांकडून सतरा अटी आलेल्या आहेत. या मारहाण प्रकरणी पोलीस काय करत आहेत, असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी केला. महाराष्ट्रात आम्ही गुंडांचे सरकार राहू देणार नाही, अशी गर्जना आदित्य ठाकरे यांनी केली.

Aaditya Thackeray
Thackeray-BJP Politics : 'जर तुम्ही काडतूस आहात तर ठाकरी बाणा तोफ'; अंधारेंनी फडणवीसांना ठणकावलं

दरम्यान, पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले, "कालपासून जो संताप संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. महाराष्ट्रात मिंधेचं सरकार आहे, मिंधेंच्या लोकांनी रोशनी शिंदेंवर हल्ला केला. या प्रकारनंतर ही पोलीस तक्रार घ्यायला तयार नाही. पोलीस कार्यालयात आयुक्तच हजर नाहीत." मारहाणी प्रकरणात रोशनी शिंदे (Roshni Shinde) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याउलट रोशनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी त्यांच्या विरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी महाविकास आघाडीने ठाण्यात आज भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com