Aditya Thackeray Challenge : ठाण्यात येऊन जिंकून दाखवणार : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान..

Aditya Thackeray Challenge to Cm Eknath Shinde : "घटनाबाह्य सरकार हे काही तासांचं आहे.."
Aditya Thackeray Eknath Shinde
Aditya Thackeray Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray Challenge to Cm Eknath Shinde : ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला, असा आरोप त्यांनी ठाकरे गटाने केला. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना गंभीर दुखापत झाल्याची बाब समोर आली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या मारहाणी विरोधात आता महाविकास आघाडीने जनप्रक्षोभ मोर्चा काढला.

Aditya Thackeray Eknath Shinde
Savarkar Gaurav Yatra : राजकीय स्वार्थापोटी बदनामीचे षडयंत्र!

या मोर्चाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray News) यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, "कालपासून जो संताप दिसत आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. जी गद्दारी झाली आहे. महाराष्ट्रात मिंधेचं सरकार बसलेलं आहे. या सरकारच्या मिंधे गटाच्या लोकांनी रोशनी शिंदेंवर हल्ला केला. या प्रकारनंतर ही कोणी तक्रार घ्यायला तयार नाही. पोलीस कार्यालयात आयुक्तच हजर नाही."

"जणू काही मोघलाई आपल्याकडे लागली आहे. मुख्यमंत्री गुजरातचे बसलेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातच नाहीत. हे सरकर आता काही दिवसांचं नाही तर काही तासांचं राहिलं आहे. आम्ही बदल्याच्या भाननेने काम करत नाही, पण लोकांच्या गरजेचं जे आहे, ते केल्याशिवाय आम्ही राहत नाही," असे ही आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray News : 'यांची गुंडगिरी महाराष्ट्रातून उखडून फेकू देवू शकतो पण...' ; रोशनी शिंदेप्रकरणी ठाकरेंचा कडक इशारा..

"लोकशाही आह की संपली? घटनाबाह्य मुख्यमंत्री ठाण्याला स्वत्::च्या बालेकिल्ला मानायचे, पण आता कोणा मानत नाही. मी त्यांना आव्हान देतो की, मी ठाण्यातून लढून जिंकून दाखवणार.ठाणेकर मला माझा स्वीकार करायला तयार आहे का?" असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com