Aditya Thackeray Challenge : ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला, असा आरोप त्यांनी ठाकरे गटाने केला. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना गंभीर दुखापत झाल्याची बाब समोर आली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संतप्त होऊन, शिंदे गट व भाजपला इशारा दिला होता. याच विरोधात आता महाविकास आघाडीने मोर्चा काढला.
या मोर्चाला संबोधित करताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले की, "आम्ही कधीही बदल्याच्या भावनेत काम करत नाहीत. पण जनतेसाठी जे आवश्यक आहे ते केल्याशिवाय राहत नाही. जे कोणीही आयएएस अधिकारी असतील, आयपीएस अधिकारी असतील, गद्दार गँगमधील असतील, त्या सर्वांना सांगतो, आमचं सरकार आल्यानंतर चौकशी केल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा ही आदित्य यांनी दिला.
कालपासून जो संताप दिसत आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. जी गद्दारी झाली आहे. महाराष्ट्रात मिंधेचं सरकार बसलेलं आहे. या सरकारच्या मिंधे गटाच्या लोकांनी रोशनी शिंदेंवर हल्ला केला. या प्रकारनंतर ही कोणी तक्रार घ्यायला तयार नाही. पोलीस कार्यालयात आयुक्तच हजर नाही, असे ही आदित्य म्हणाले.
"लोकशाही आह की संपली? घटनाबाह्य मुख्यमंत्री ठाण्याला स्वत्::च्या बालेकिल्ला मानायचे, पण आता कोणा मानत नाही. मी त्यांना आव्हान देतो की, मी ठाण्यातून लढून जिंकून दाखवणार.ठाणेकर मला माझा स्वीकार करायला तयार आहे का?" असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.