Aditya Thackeray News : 'काळजी करू नको आदित्य..' ; 'या' अभिनेत्री आल्या ठाकरेंच्या साथीला !

Aditya Thackeray News : "आता पुढील जबाबदारी आपल्यावर आहे, महाराष्ट्राची जनता..."
Aditya Thackeray News :
Aditya Thackeray News :Sarkarnama

Aditya Thackeray Tweet News : मागील अकरा महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी (11 मे) महत्वपूर्ण निर्णय दिला. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करण्याआधीच राजीनामा दिला होता, त्यामुळे त्यांना तत्कालीन सरकारची परिस्थिती पूर्ववत करता येणार नाही, अशी महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यानंतर समाज माध्यमांवर यावर भरमसाठ प्रतिक्रिया उमटू लागल्या.

Aditya Thackeray News :
Uday Samant On Barsu News : केवळ राज्यात शिंदे-फडणवीस सरकार म्हणून बारसूला विरोध

दरम्यान युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील समाज माध्यमावर याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. सरकारबद्दल आदित्य यांनी टीका करत, सरकार असंवैधानिक, बेकायदा आणि अनैतिक असल्याचे म्हंटले आहे. हाच एक मार्ग मिंधे भाजपा सरकारकडे बघण्याचा आहे, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या या पोस्टवर आता ज्येष्ठ सिने-अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी कमेंट केली आहे. आपल्या कमेंटमध्ये अभिनेत्री गरेवाल म्हणतात, “आदित्य काळजीचं कारण नाही, आता पुढील जबाबदारी आपल्यावर आहे, महाराष्ट्राची जनता मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीवर केलेला हा बेकायदेशीर कब्जा नक्कीच हटवेल.”

Aditya Thackeray News :
Maharashtra Political Crisis : शिंदे-फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करणार; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा !

सिमी गरेवाल यांच्या या कमेंटवर आदित्य ठाकरेंनी (Aditya thackeray) त्यांचे आभार मानले आहेत. याच पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, “आमच्या सरकारवर ताबा घेण्याआधी पूर्वीचे राज्यपाल यांची भूमिका आणि मदत ही लोकशाही आणि राज्यघटना दडपल्यासारखी होती. त्यांनी आपले कर्तव्य राज्यपाल म्हणून नाही तर एका विशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम पाहिले. जर यांच्यात काही नैतिकता आणि लाज तज जराशी उरली असेल तर असंवैधानिक-घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी (CM) राजीनामा द्यावा. नैतिकता आणि लोकशाही सर्वोच्च असली पाहिजे,” असे आदित्य म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com