Shivsena UBT-MNS Alliance : CM फडणवीसच्या भेटीनंतर देखील शिवसैनिक प्रचंड आशावादी! आदित्य-राज ठाकरेंचे एकत्रित बॅनर झळकले!

Aditya Thackeray Raj Thackeray : राजकारणात कोणी कोणालाही भेटू शकतो. त्यात गैर काहीच नाही. पण शेवटी उद्धव ठाकरे-राज ठाकरे हे एकत्र येणारच, असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
Banner with Aditya and Raj Thackeray's images seen in Ambernath, triggering talks of new political dynamics.
Banner with Aditya and Raj Thackeray's images seen in Ambernath, triggering talks of new political dynamics.sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होईल, अशा चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे अचानक बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका हाॅटेलमध्ये भेटले. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. त्यामुळे मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीला सुरुंग लावण्याचे काम फडणवीसांनी केल्याची चर्चा होती.

या घटनेच्यानंतर ठाकरे बंधु एकत्र येतील, असा विश्वास उद्धव ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारी, शिवसैनिक व्यक्त करत आहेत. त्यातच आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे बॅनर एकत्र झळकल्याने चर्चांना उधान आले आहे.

अंबरनाथमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या एकत्रित शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे यांनी अंबरनाथ शहरात हे बॅनर्स लावले आहेत.

अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे काक-पुतण्याच्या वाढदिवसाच्या एकत्रितपणे शुभेच्छा देणारे हे बॅनर लावण्यात आले आहे. संतोष शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे कुटुंबाने एकत्र येण्याची भावना महाराष्ट्राच्या मनात असून ती मांडण्यासाठीच हे बॅनर लावले आहे.

ठाकरे बंधु एकत्र येणार

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, राजकारणात कोणी कोणालाही भेटू शकतो. त्यात गैर काहीच नाही. पण शेवटी उद्धव ठाकरे-राज ठाकरे हे एकत्र येणारच.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com