Aditya Thackeray News : महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंनी ठोकला शड्डू; म्हणाले, "मुंबईकडे वाकडी नजर..."

Thackeray Group March On BMC : 'समजनेवालो कों इशाराही काफी है'
Aditya Thackeray, BMC
Aditya Thackeray, BMCSarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray On BMC Election : मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक आहे. या प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकार महापालिकेत मोठा भ्रष्टाचार होत आहे. महापालिकेच्या प्रत्येक कामांच्या कंत्राटात घोटाळा होत आहे. वारंवार माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले गेले. या भ्रष्टाचाराची मात्र आम्ही नोंद घेतली आहे. मुंबई पालिकेवर आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचा भगवाच भडकणार आहे. त्यावेळी पालिकेच्या पैशांकडे वाकडी नजर असलेल्या कुणालाही सोडणार नाही, असा इशारा देत ठाकरे गटाचे आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. (Latest Political Marathi News)

Aditya Thackeray, BMC
Aditya Thackeray In BMC March : 'बीएमसी'त भ्रष्टाचार करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही ! आदित्य ठाकरेंचा इशारा

ठाकरे गटाच्या वतीने शनिवारी (ता.१ जुलै) रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी पाऊस सुरू असतानाही या मोर्चात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. या गर्दीला उद्देशून आदित्य ठाकरे यांनी आगामी काळात महापालिकेत ठाकरे गटाचे सत्ता येणार असल्याचा दावाही ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी 'समजनेवालो कों इशाराही काफी है' असे म्हणत शिंदे गटाला टोलाही लगावला.

आदित्य ठाकरे म्हणाले, "राज्यातून शिवसेना (शिंदे गट) ला हकलून देण्याची वेळ आली आहे. मुंबई महापालिकेची कधी नव्हे इतकी वाईट अवस्था झाली आही. गेल्या २५ वर्षांत केलेल्या कामांत कुठेही भ्रष्टाचार झाला नाही. आता वर्षभरापासून या पालिकेवर कुणी नगरसेवक नाही. प्रशासकराज आहे. या सरकारच्या काळात बिल्डर, व्यापाऱ्यांसाठी रेड कार्पेट टाकले जाते. मात्र विविध कामांसाठी गेलेल्या सामान्य मुंबईकरांना डावलेले जाते. बिल्डरसाठी आलेल्या फोनला उत्तर देण्यातच त्यांचा वेळ जातो. नागरिकांसाठी वेळ नाही."

Aditya Thackeray, BMC
Amruta Fadanvis News : अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर आक्षेपार्ह पोस्ट, सीए विरुद्ध गुन्हा दाखल..

आदित्य ठाकरे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नाव न घेता टीका केली. ठाकरे म्हणाले, पूर्वीचे राज्यपाल हे भाज्यपाल होते. त्यामुळे वारंवार तक्रारी करूनही त्यांनी दखल घेतली नाही. आताच्या राज्यपालांना मुंबईतील भ्रष्टाचाराबाबत निवेदन दिले आहे. त्यांना पालिकेतील भ्रष्टाचाराची माहिती दिली. मुंबईतील भ्रष्टाचाराबाबत 'एसआयटी' लावाली तशी आताच्याही कामांचीही चौकशी करण्यात यावी. त्यासाह पुणे, नाशिक, नागपूर पालिकेचीही चौकशी करण्यात यावी."

यावेळी ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना इशरा दिला आहे. ते म्हणाले, "दिल्लीश्वरांच्या तालावर कुणी नाचू नये. ही मुंबई आमची आहे. त्यावर कुणी वाकडी नजर ठेवू नये. आमचे पुढची फाईलवर सही करताना विचार करावा. सरकार आले की तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ."

Aditya Thackeray, BMC
Buldana Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर वाहन पेटल्यास मृत्यू अटळ, ‘हे’ आहे कारण...

मुंबईतील रस्त्यांची कामे मित्रांना देत असल्याचाही आरोप आदित्य यांनी यावेळी केला. ते म्हणाले, "रस्त्यांचे कामे करताना ४२ जणांना सांगावे लागते. १६ विविध संस्थांशी समन्वय साधावा लागतो. मात्र सात वर्षांचा अनुभव असलेले मुख्यमंत्री म्हणतात एका रात्रीत काम करणार. मुंबईतील रस्त्यांच्या कामांसाठी पाच झोन केले आहेत. या झोनमधील रस्त्यांची कामे त्यांच्या पाच मित्रांना दिले जाते."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com