
Aditya Thackeray On Eknath Shinde : मुंबईतील रस्त्यांच्या कामांसाठी पाच झोन तयार केले आहेत. या झोनमधील कामांसाठी मुख्यमंत्र्यांच्या पाच ठेकेदार मित्र निवडले आहेत. जूनपर्यंत ५० रस्ते तयार करू म्हणणाऱ्या सरकारला तेही काम करता आले नाही. कर्नाटकातील तत्कालीन भाजप सरकार ४० टक्के भ्रष्ट होते. आता राज्यातील सराकर मात्र १०० टक्के भ्रष्ट आहे. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. अधिकाऱ्यांसह सर्वांनाच या भ्रष्टाचाराची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (Latest Political News)
ठाकरे गटाच्या वतीने शनिवारी (ता. १ जुलै) रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "मुंबई महापालिके अंतर्गत मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरू आहे. सध्या मुंबईत रस्ता, खडी, पदपथावरील फर्निचर, शौचालय बांधकाम आदी घोटाळ्यांची माहिती आहे. नगरसेवकांच्या आखत्यारीत होणारी कामे राज्य सरकार ठेकेदारांच्या मार्फत करीत आहेत. त्या कामांचा ठेका काही ठराविक ठेकेदारांनाच कामे दिली जात आहेत. यातून मुंबई पालिकेची लूट करण्याचा राज्याचा डाव आहे. हे सरकार पैशाने आणि नैतिकतेने १०० टक्के भ्रष्ट आहेत."
महापालिकेत चुकीच्या फाईल्सवर सही करणाऱ्या आणि करवून घेणाऱ्या कुणालाही सोडणार नसल्याचा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला. आदित्य म्हणाले, "पालिकेत सुरू असलेल्या घोटाळ्याबाबत भाजपचे, सपाचे आमदारही बोलतात. या भ्रष्टाचाराबाबत मी तीन पत्रे लिहिली. सपाच्या आमदारांनीही पत्र दिले होते. मात्र संबंधित उपायुक्तांनी दोघांना वेगवेगळी उत्तरे दिली आहेत."
यावेळी त्यांनी घोटाळे करणाऱ्यांना इशाराही दिला आहे. ठाकरे म्हणाले, "या घोटाळ्यातून १०० कोटींपर्यंतच्या गोष्टींची कामे आता २६३ कोटींवर गेली आहेत. या घोटाळ्यांची नोंद घेतली आहे. आमचे सरकार आल्यानंतर अधिकारी असो वा इतर कुणी आम्ही कुणालाही सोडणार नाही. घोटाळ्यात अडकलेल्या सर्वांना तुरुंगात टाकरणार. मुंबईत सर्व काही खपवून घेऊ. मात्र मुंबईच्या पालिकेच्या पैशांना हात लावाल तर याद राखा!"
मुंबई महापालिकेत कोविड काळात कथीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आणि शिवसेनेकडून होत आहे. त्याबाबत ईडीकडून चौकशीही सुरू झाली आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तींयाची चौकशी करण्यात आली. तसेच मुंबई महापालिकेतील तत्कालीन अधिकाऱ्यांचीही चौकशी होत आहे. दरम्यान, महापालिकेवर प्रशासक राज आहे.
या प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकार महापालिकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रत्येक कामांच्या कंत्राटात घोटाळा होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत आज ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.