Aditya Thackeray letter to CM Fadnavis: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवले पत्र अन् केली 'ही' मोठी मागणी, म्हणाले...

Aditya Thackeray and CM Fadnavis News : जाणून घ्या, आदित्य ठाकरे यांनी नेमकं कोणत्या मुद्य्यावरून पत्र लिहिले आहे आणि काय म्हटलं आहे?
Aditya Thackeray letter to CM Fadnavis
Aditya Thackeray letter to CM FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray on Belgaum Karwar issue : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश करण्याच्या प्रस्तावाला आम्ही एकमताने पाठिंबा देण्यास तयार आहोत; तसेच राज्य शासनाने लवकरात लवकर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशा मागणीचं पत्र महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले.

बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या ह्या अन्यायाचा तीव्र निषेध! असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे.

Aditya Thackeray letter to CM Fadnavis
Nagpur Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली! 16 डिसेंबरपासून नागपुरात होणार सुरू

तत्त्पुर्वी 'बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच! माझं कर्नाटकातल्या सरकारला आवाहन आहे की त्यांनी मराठी माणसांवरचा हा अन्याय तातडीने थांबवावा! महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही! आणि केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे की हा सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा.' असंही आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी ट्वीटद्वारे म्हटलेलं आहे.

Aditya Thackeray letter to CM Fadnavis
Raju Shetti Warning News : '...तर एकेएकाला जोड्यानं हाणू', राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा!

फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरेंनी काय म्हटले? -

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना(Devendra Fadnavis) लिहिलेल्या पत्रात म्हणतात 'सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. आजच सभागृहात प्रथेप्रमाणे आपला परिचय झालेला आहे. त्याबद्दल सर्व सदस्यांनी आपले अभिनंदनही केलेले आहे. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे बेळगाव आणि कारवारचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रश्नी मराठी माणसांना न्याय देणे किती गरजेचे आहे, हे आपण जाणताच. बेळगाव कारवार प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. मी आपणास कळकळीची विनंती करत आहे, की बेळगाव कारवार प्रश्नी आपण मराठी माणसाला न्याय द्यावा.'

तसेच 'आपण सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगावं कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा, आम्ही एक मताने या ठरवास पाठिंबा देवू. बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्राला लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती.' असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com