Shiv Sena : शिंदे -ठाकरे समर्थक आमने-सामने ; आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले

aditya thackeray : आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यात येत आहे. पाचोरा धरणगाव पारोळा या बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा होणार आहेत.
aditya thackeray, Gulabrao Patil
aditya thackeray, Gulabrao Patilsarkarnama

जळगाव : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (aditya thackeray) आज (शनिवारी) जळगाव जिल्ह्याचे दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात शिंदे गट व उद्धव ठाकरे समर्थक आमने-सामने आले आहेत. (aditya thackeray news update)

धरणगावात प्रवेश मार्गावरील आदित्य ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना मध्यरात्री घडली. त्यावरून धरणगावात तणाव निर्माण झाला आहे.

सहा ते सात ठिकाणी आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडण्यात आल्याचे समजते. द्वेष भावनेतून शिवसेना, युवासेनेचे स्वागत बॅनर फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे, या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यात येत आहे. पाचोरा धरणगाव पारोळा या बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा होणार आहेत.

aditya thackeray, Gulabrao Patil
CBI Raid : सिसोदिया यांची पंधरा तास चौकशी ; लॅपटॅाप, मोबाईल जप्त

"शिव संवाद" यात्रा दौरा आज दुपारी एक वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेनेकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत. काल (शुक्रवारी) मध्यरात्री काही अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर, व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत बॅनरवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार पाहायला मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com