Silver Oak Attack : माझ्यावर जबरदस्ती होतेय : कोठडी मिळताच सदावर्तेंचा पोलिसांवर गंभीर आरोप

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवास स्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) रात्री गावदेवी पोलिसांकडू अटक करण्यात आली. त्यांना आज (ता. ९ एप्रिल) न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर पोलिस ठाण्यात आल्यानंतर सदावर्ते यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा इशारा दिला. (Adv. Gunaratna Sadavarte makes serious allegations against the police)

दरम्यान, सिल्व्हर ओक परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या ११० आंदोलक कर्मचाऱ्यांचाही जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte : वळसे-पाटील तुमची पाटीलकी आता संपलीय : जयश्री पाटील

ॲड. सदावर्ते यांना न्यायालयातून पुन्हा पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा दावा करून माझ्यावर जबरदस्ती होते आहे, असा आरोपही त्यांनी पोलिस प्रशासनावर केला आहे. दरम्यान, सदावर्ते यांना गावदेवी ठाण्यातील पोलिस पथकाने शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) रात्री त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. तब्बल दीड तासाच्या चौकशीनंतर रात्री दहाच्या सुमारास सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे.

Gunaratna Sadavarte
Silver Oak Attack : पवारांना पितृस्थानी मानता अन्‌ वकिली फडणवीसांची करता..? हे दुर्दैवी!

पोलिस घरी आल्यानंतर त्यांना ‘मला नोटीस न देता चौकशीला कसे आला आहात,’ अशी विचारणा सदावर्ते यांनी केली होती. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सदावर्ते यांनी ‘माझी हत्या होऊ शकते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात माझ्या पतीने तक्रार दिलेली आहे,’ असा आरोप ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता.

Gunaratna Sadavarte
‘मातोश्री’वर हल्ला करायचा होता; म्हणजे काय किंमत मोजावी लागली असती, ते कळले असते!

त्यानंतर आज सदावर्ते यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी ही ‘जमिनीच्या गैरव्यवहारसंदर्भात आम्ही जी तक्रार मलबार हिल पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) माझा सुमारे १०० पानांचा जबाब लिहून घेतला आहे. त्याचा बदला घेण्यासाठीच ॲड. सदावर्ते यांच्यावर हा वैयक्तीक हल्ला करण्यात आलेला आहे. पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून सदावर्ते यांना टार्गेट केले जात आहे. पण, शरद पवार, दिलीप वळसे पाटील ही तुमच्या घरची जहॉगिरी नाही, ही तुमची पाटीलकी नाही. तुमची पाटीलकी संपलेली आहे,’ असा आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com